पाचोऱ्यात कोरोना बाधीताचा मृत्यू ,सोयगाव तालुक्यात खळबळ

सोयगाव,दि.२८:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगाव तालुक्याची सर्वात कमी अंतराची सीमारेषा असलेल्या पाचोऱ्यात मंगळवारी एकाच्या मृत्यूनंतर कोरोनाचा अहवाल सकारात्मक आल्याने सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.पाचोरा तालुक्याच्या सीमारेषेवर सोयगावच्या ५२ गावाची हद्द ७ कि.मी अंतराची आहे.त्यामुळे निम्म्या तालुक्यात खळबळ उडाली आहे.त्यातच पाचोर्याला एकाचा मृत्यू झाल्याची बातमी सोयगाव तालुक्यात मंगळवारी धडकताच प्रशासनही खडबडून जागे झाले असल्याने सोयगाव तालुक्यात धावपळ उडाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरयाला एकाचा मृत्यू नंतर सकारात्मक अहवाल आल्याने सोयगाव तालुक्यातील सीमारेषेवर असलेल्या ५२ गावांची चिंता वाढली आहे.सोयगाव शहर वगळता तालुक्याचा बनोटी,गोंदेगाव पर्यंतचा भाग पाचोरयाला लागुनच आहे.त्यामुळे तालुका प्रशासन सतर्क झालेले असून जळगाव जिल्ह्याच्या तपासणी नाक्यांवर तगडा बंदोनास्त लावण्यात आला आहे.पाचोर्याच्या मृत्यूची बातमी गावात येताच काही गावांनी पाचोऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यांना खोदकाम करून रस्ते पूर्णतः बंद पाडले आहे.सोयगाव तालुक्यातील ५२ गावांचा पाचोर्याशी जवळचा संपर्क आहे. शेती,किराणा,व्यवसाय आदि व्यवसायातून पाचोर्याशी सोयगाव तालुक्यातील काही गावांची नाळ जोडली गेली आहे.परंतु पाचोऱ्यातील घटनेमुळे सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पाचोऱ्यात मृत्यू झाल्याची कळताच तालुका प्रशासन खडबडून जागे झाले असून सीमारेषेवरील गावातील नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या असून पाचोर्याकडे न जाण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहे.या भागातून कोणीही नातेवाईक घरी आल्यास त्याची कोरोना तपासणी करण्याबाबत जनजागृती करण्यात आली आहे.

सोयगाव तालुक्यात अद्यापही एकही संशयित कोरोनाचा रुग्ण आढळलेला नसून मात्र आय आठवड्यात सोयगाव तालुका मात्र एकीकडे औरंगाबाद आणि दुसरीकडे जळगाव असा दोन रेड झोन जिल्ह्यांच्या चक्रव्युहात अडकला असल्याने आता तालुका प्रशासनाला चक्रव्यूहातून बाहेर काढण्याची कसरत करावी लागणार आहे.