अंबाजोगाई तालुकाकोरोना विषाणू - Covid 19बीड जिल्हाब्रेकिंग न्युजसामाजिक

"शिक्षक-मैत्री" प्रतिष्ठान तर्फे दिव्यांग तरूणास मदत

अंबाजोगाई:रणजित डांगे―

चनई परिसरात राहणा-या व जन्मताच दिव्यांग (100 टक्के अंध) असलेल्या तरुणास लॉकडाऊन मुळे खाण्यासाठी काहीही नाही. असे सामाजिक कार्यकर्ते दिनेश घोडके यांना समजले असता त्यांनी ही माहिती
"शिक्षक-मैत्री" प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार यांना सांगितली.असता रापतवार सरांनी तात्काळ "शिक्षक-मैत्री" प्रतिष्ठान तर्फे गव्हाचे पीठ,तांदूळ,साखर, तुरदाळ,तेल अशा प्रकारचे जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेले अन्नधान्याचे एक कीट देऊन त्यांची मदत केली.माणुसकी जोपासली.अन्नधान्याचे कीट देताना शिक्षक-मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार,सचिव उमेश नाईक,तालुका क्रीडा समन्वयक दत्ता देवकते, राजीव गांधी पंचायतराज संघटनचे मराठवाडा अध्यक्ष राणा चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते अजीम जरगर, दिनेश घोडके हे उपस्थित होते.