सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― कोरोना विषाणू चे संकट संपूर्ण भारतात आणि आपल्या महाराष्ट्रात आले आहे त्यामुळे या संकटकाळी शासनाच्या सोबत राहून सामाजिक जवाबदरीचे भान ठेवून श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्यादित आमखेडा ता.सोयगाव चे वतीने मा.मुख्यमंत्री सहायता निधीस रु.११०००₹( अंकार हजार)चा धनादेश श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्यादित आमखेडा चे अध्यक्ष अॅड राजेश (भैय्या) गिरी यांनी मध्यवर्ती बॅक शाखा सोयगाव येथील मॅनेजर यांचे यांचेकडे सुपूर्त केला या प्रसंगी अध्यक्ष अॅड राजेश (भैय्या) गिरी,उपाध्यक्ष विष्णू दुसाने,तथा संचालक बाबु पटेल,युवराज आगे,अर्जुन बोडखे,आकाश वरकड,अमोल निकम,सतिष कोलते,सुनिल निकम,एस.टी.पाटील, समदशहा तुराबशहा,रविंद्र इंगळे, व्यवस्थापकीय संचालक ज्ञानेश्वर पाटील,सुनिल सैदाणे, गणेश पवार,देवीदास बैरागी हे उपस्थित होते.