औरंगाबाद जिल्हाकोरोना विषाणू - Covid 19ब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यसामाजिक

मेंढपाळांना रेशन आणि मेंढ्यासाठी चारापाण्याची सोय करा ― धनगर समाज क्रांती मोर्चा

औरंगाबाद:आठवडा विशेष टीम―देशांवर कॉरोनाचे सावट असून महाराष्ट्र राज्य पण हातबल झाले आहे, यामुळे मराठवाडा विभाग आणि औरंगाबाद जिल्ह्यातील मेंढपाळाना ग्रामीण भागामध्ये मेंढ्या चराई साठी पुरेसा चारा उपलब्ध नसल्यामुळे मेंढ्याचा मृत्यू होत आहे.त्याच बरोबर मेंढपाळाना काही गावकरी हाताशी धरून गावात प्रवेश नाकारत असल्याचे दिसून येत आहे.कोरोना संसर्गजन्य रोगा मुळे जनावरांचे दवाखाने बंद असल्यामुळे मेंढ्या आजारी पडून मृत्यू पडत आहे आणि जनावरांना उन्हाळा आल्यामुळे हिरवा चारा पण राहिला नाही आणि पिण्याचे पाणी पण राहिले नसल्यामुळे मेंढपाळा वर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे या मेंढपाळाना शासनाने लवकरात लवकर आर्थिक मदत घ्यावी व मेंढपाळावर अन्याय करणाऱ्या वर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी धनगर समाज क्रांती मोर्चा यांनी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यलय मार्फत मराठवाडातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय यांना ई-मेल करून निवेदन दिले आहे.

प्रशासनाला ई-मेल केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मेंढपाळाचा संसार हा सपूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे,मेंढपाळा वर कोणताही संसर्ग होत नाही असे म्हणता येत नाही पण ते नेहमी आपल्या मुला-बाळासोबत रानावनात भटकत असतात त्याना कोणत्याही प्रकारचे छत नाही त्याच बरोबर त्यानां गावात काही किराणा व लहान बाळांसाठी दूध व जीवनावश्यक वस्तू जर घ्यायची असेल तर त्यानां गावामध्ये येऊन देत नाही याची प्रशासनाने दखल घेऊन गावातील सरपंच ,पोलीस पाटील ग्रामसेवक, तलाठी यांना सूचना देऊन मेंढपाळावर होणाऱ्या अन्यायावर त्वरित कार्यवाही करण्यास सांगावे, मेंढपाळाना जीवनावश्यक वस्तु ,गहू तांदूळ, दाल, आणि मेंढ्याचे औषध ,लहान बाळांसाठी दूध बिस्कीट आशा गोष्टीसाठी गावात कुठलीही अडचण न येता त्याना प्रवेश द्यावा तसेच त्याना अन्यधान्य उपलब्ध करून दयावी अशी मागणी धनगर समाज क्रांती मोर्चा चे संस्थापक अध्यक्ष डॉ.संदीप घुगरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटक युवा मेंढपाळ शिवाजी नेमाने यांनी केली त्यांच्या सोबत दादाराव नजन,दीपक महानवर, गणेश तोतरे ,कृष्णा तोतरे, गणेश बनसोडे,बबन लव्हाळे, अंबादास गोयकर,विकास नेमाने,अमोल नेमाने,लहानबाई शिवाजी नेमाने,ज्योती बबन लव्हाळे इत्यादी धनगर समाज क्रांती मोर्चा च्या कार्यकर्ते मेंढपाळ यांनी मागणी केली आहे

Back to top button