मुंबई: देशात भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यापासून सरकारने बेरोजगारी,शेतकऱ्यांच्या प्रश्नांना कायम बाजूला ठेवल्याचे औचित्य साधून,बेरोजगारीच्या प्रश्नावर आवाज उठवत जेएनयु चे माजी विद्यार्थी नेते कन्हैया कुमार आता बेगूसराय लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.कन्हैया यांचे प्रतिस्पर्धी गिरीराज सिंह भारतीय जनता पार्टी तर्फे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
कायमच चर्चेत असलेले कन्हैया कुमार भारतीय जनता पार्टी च्या उमेदवाराचा पराभव करत लोकसभेत देशातील बेरोजगारी,शेतकरी-कामगारांचे प्रश्न मांडण्यासाठी जातील का ? असा प्रश्न बेगूसराय सह देशातील जनतेला पडला आहे.सततच्या मोदींवरील टिकास्त्रामुळे कन्हैया कुमार यांना मोदी विरोधीगटाचा चांगलाच पाठिंबा मिळत आहे.त्यांच्या प्रचारासाठी सिनेअभिनेते सुद्धा पुढे आलेले दिसत आहेत.
विविध राज्यातून कन्हैया कुमार यांचे वैचारिक समर्थक त्याच्यासाठी आपल्यापरीने जेवढे जमेल तेवढे वातावरण निर्मितीचे काम करत असताना दिसत आहेत.त्यामुळे आता भाजपाला कन्हैया कुमार निवडणूक लढवीत असल्याने देशात पराजय दिसू लागला आहे का? असा प्रश्न जनतेतून समोर येत आहे.