कोरोना विषाणू - Covid 19बीड जिल्हाबीड तालुकाब्रेकिंग न्युजसामाजिक

शासन म्हणतंय हात धुवा , घोटभर पाण्यासाठी जीव जायची वेळ ; कुठुन पाणी आणून सारखा हात धुवायचा डॉ ढवळे तुम्हीच सांगा ? पारधी समाजातील महिलांचा निरूत्तर करणारा प्रश्न

लिंबागणेश दि.२९:आठवडा विशेष टीम― बीड तालुक्यातील ग्रामिण भागांमधे आता उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्या आहेत, तिव्र पाणीटंचाई मुळे जीव धोक्यात घालून महिला पाणी शेंदताना दिसतात, विहीरीवर ना कठडे आहेत,ना रहाटगाडगे, कधी कधी पाणी शेंदताना महीलांच्या हातून हंडे विहीरीत पडले आहेत तर कधी महीला, आम्हाला एक हापसा (हातपंप ) शासनाकडुन मिळवुन दर्या,अशी मागणी महिलांनी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांना केली आहे.याविषयी डॉ.गणेश ढवळे यांनी लेखी निवेदन ई-मेलव्दारे जिल्हाधिकारी बीड यांना पाठवुन हातपंप मिळावा अशी मागणी केली आहे.बीड तालुक्यातील मौजे बोरखेड येथिल १०० लोकसंख्या असलेल्या पारधी समाजातील गावडे वस्तिवर पिण्याच्या पाण्याची तिव्र टंचाई निर्माण झाली आहे, अत्यंत दुर्गम, पाय-या नसणा-या विहिरीतून दोरीने पाणी शेंदावे लागते, कधीकधी तोल जाऊन हंडा विहीरीतील पाण्यात पडतो तर कधी बाईमाणूस पाणी शेंदताना पाण्यात पडल्याच्या घटना घडल्या आहेत, दिवसभर लाईट नसल्याने रात्री १२ वाजता लाईट येते, त्यामुळे दिवसातील बराच वेळ पाणी शेंदण्यातच जातो. आम्हाला वस्तीवर एखाद्या हापसा घेऊन द्यावा एवढीच हात जोडून विनंती आहे.अशी मागणी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर ,सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडे महिलांनी केली.डां.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी यासंबधी जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन ई-मेलव्दारे पाठवले आहे.

पल्लवी युवराज पवार :

दिवसभर महिलांना असेच पाणी शेंदावे लागते, मोटार पंप आहे परंतु दिवसा लाईट नसणे, रात्री १२ वा.लाईट येते,जीव मुठीत धरून पाणी शेंदावे लागते, कधीकधी तोल जाऊन हंडा पाण्यात पडतो तर कधी महीला पाण्यात पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

फुलाबाई रोहीदास पवार :

दिवसभर ऊन्हातान्हात पिण्याचे पाणी शेंदण्यासाठी दिवस घालवावा लागतो,दिवसभर लाईट नसते, विहीरीला कठडा नाही,लहान मुले आमच्या मागे पळतात त्यामुळे विहीरीत पडण्याची भिती वाटते,आम्हाला शासनाने आमच्या वस्तीवर हातपंप घेऊन द्यावा म्हणजे आमचे हाल कमी होतील आणि लेकरांच्या जीवाला धोकाही होणार नाही.

केशरबाई बबन पवार :

कोरोना महामारी मुळे ग्रामसेवक, तलाठी सांगतात लांब रहा,म्हणून वस्तीवर तुटक झोपड्या बांधून रहात आहोत, शासन म्हणतंय सारखा सारखा हात धुवा पण घोटभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागतोय, डॉ.ढवळे साहेब तुमीच आमची तजवीज करा आणि एखादा हापसा मिळवुन द्या.

डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते बीड :

बोराखेड ग्रामपंचायत मधिल १०० लोकसंख्या असणारे पारधी समाजाचे हे कुटुंब आधीच पोलिस प्रशासन दरबारी त्यांच्यातील काही गुन्हेगारी क्षेत्रांशी निगडित लोकांमुळे जरी बदनाम असले तरी गावडे वस्तीवरील महिलांना पाण्यासाठी जीव धोक्यात घालून पाणी शेंदावे लागते, गावडे वस्तीवर हातपंप मिळावा यासाठी मी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, ग्रामविकास मंत्री, आदिवासी कल्याण मंत्री , सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड, आ.संदिपभैय्या क्षीरसागर , आ.विनायकरावजी मेटे साहेब यांना लेखी निवेदन ई-मेलव्दारे पाठवले आहे.


Back to top button