कोरोना विषाणू - Covid 19पाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजसामाजिक

घार उडते आकाशी,चित्त तिचे पिलापाशी अशीच वृत्ती खाकी वर्दीतील दिलदार माणूस अंकुश मिसाळ यांच्या सामाजिक कार्यामुळे पाटोदाकरांना आली आहे

पाटोदा:गणेश शेवाळे― घार उडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी तसंच काही पाटोद्यात घडले आहे पुणे जिल्ह्यात मंचर पोलीस स्टेशन मध्ये सेवा करत असलेले अंकुश संपतराव मिसाळ हे कोरोनाच्या या कठीण काळात डॉक्टर, नर्सेस, सारखे पोलिस खातेही कोरोनाविरोधातल्या लढाईत आपल्या जिवाची पर्वा न करता लढत आहेत पोलिसांवर प्रचंड ताण आहे. बाहेर ड्युटी करायची आणि कुटुंबियांकडे देखील लक्ष द्यायचं. माञ मंचर पोलिस स्टेशनचे अंकुश मिसाळ यांनी रात्रंदिवस ड्युटी करून तेथील लोकांची काळजी घेत असताना कुटुंबा बरोबर आपण जेथे लहानाचे मोठे झालोत तिथे पुण्यातील लोकांचे हाल व अवस्था पाहून ज्यांनी लहानपणी आपल्याला सांभाळले खेळवले आशा वडीलधाऱ्या आपल्या गावातील माणसांचे काय हालहोत असतील जे आपल्या बरोबर लहानपणी सोबत खेळले त्यां मित्रांना किती अडचणीत असतील लॉकडाऊनमुळे सध्या पोलिसांवर प्रचंड ताण असताना देखील आपल्या गावकऱ्यांचे हालहोत असतील यांचा विचार करून मित्राच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करून संपूर्ण गावाला मित्रांन मार्फत मोफत किराणा सामानाचे किट वाटून अंकुश मिसाळ यांनी देश सेवा करत असताना कुटुंबा बरोबर आपल्या गावाची काळजी मिसाळ हे घेताना दिसून येत असल्यामुळे पाटोदा तालुक्यातुन मोठा अनमोल संदेश महाराष्ट्र राज्यात जात आहे कारण ह्या युगात नोकरी मोठा पैसेवाला झाला की सर्वांना विसरून जाणारे अनेक जण लोकांनी पाहिले आहेत पन अंकुश मिसाळ सारखा एखांदाच असतो जो आपण जिथे ड्युटी करतोत तेथील लोकांच्या अडचणी पाहून आपण जिथे लहानाचे मोठे झालोत त्या आपल्या गावातील लोकांना किती अडचणी होत असतील यांचा विचार करून समाजात अंकुश मिसाळ यांनी मोठा सामाजिक संदेश देऊन खरा माणुसकी धर्म जोपासल्याने खाकी वर्दीतील दिलदार माणसामुळे घार उडते आकाशी,चित्त तिचे पिलापाशी अशीच वृत्ती खाकी वर्दीतील दिलदार माणूस अंकुश मिसाळ यांच्यामुळे पाटोदेकराना आला आहे.

Back to top button