कोरोना विषाणू - Covid 19पूणे जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यशेतीविषयक

#fruitizm पुण्यातील ‘फ्रुटीजम्’ घेणार आता शेतकऱ्यांचा भाजीपाला ; अन्नदात्याला संकटाच्या काळात मदतीचा हात

आठवडा विशेष टीम― अवघ्या काही दिवसातच सर्व जगाला आपल्या विळख्यात घेणाऱ्या कोरोनानं फक्त महामारीचं संकट आणलं नाही तर सर्व जग लॉकडाउन करून टाकलं. कालपर्यंत धावणारं जग आज एकाएकी ठप्प झालं. या सगळ्या परिस्थितीत भारतानं या कोरोनाला हरवायचं ठरवलं. प्रत्येक भारतीय नागरिकानी आपली सोशल डिस्टंसिंगची जवाबदारी ओळखली आणि घरात स्वतःला बंद करून घेतलं. म्हणूनच भारत आज बऱ्याच प्रमाणात कोरोनावर मात करण्यात यशस्वी झालाय. पण याची झळ भारतात प्रत्येकाला बसली. अगदी सामान्य वाटणाऱ्या सेवासुद्धा मिळेनाश्या झाल्या. जीवनावश्यक वस्तूंची तूट निर्माण झाली. सर्वात मोठा फटका अन्नदात्या शेतकऱ्याला बसला. माल आहे पण विकणार कसा? एकीकडे शेती उत्पादनं, विशेषतः भाज्या फळे, गिर्हाईक नाही म्हणून वाया जात आहेत, तर दुसरीकडे नागरिकांना या सर्व वस्तू मिळवण्यासाठी खटपट करावी लागत आहे.
ही सामाजिक नड ओळखून, पुण्यात यशस्वीरित्या कार्यरत असलेल्या ‘फ्रुटीजम्’ fruitizm.com (पायसम फूड सर्विसेस प्रायवेट लिमिटेड ) कंपनीनं एक उपक्रम हाती घेतला आहे . हा उपक्रम अगदी सोपा, पण अत्यंत प्रभावी ठरत आहे. शेतकऱ्यांकडून माल विकत घ्यायचा, म्हणजे त्यांचा माल वाया जाणार नाही व त्यांचे नुकसान होणार नाही आणि शहरात विविध ठिकाणी लोकांपर्यंत तो पोहोचवायचा. पायसम फूड सर्विसेस प्रायवेट लिमिटेड (‘फ्रुटीजम्’) कंपनी या पूर्वी फक्त फळे आणि आणि त्याच्या पासून तयार केलेली ज्युसेस यांचे घरपोच सुविधा देत होती. पण कोविड १९ मुळे जपावा लागणार सोशल डिस्टंसिंग लक्षात घेता कंपनीने भाजीपाला आणि किराणा मालहि घरपोच पोहचवण्याठी सुरुवात केली आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना रास्त दरात जीवनावश्यक वस्तू पोहोचवणे शक्य झाले आहे. फ्रुटीजम् कंपनी याच क्षेत्रात पूर्वी पासून कार्यरत असल्यामुळे स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाचे सर्व आवश्यक उपाय येथे केले जातात. कोणत्याही प्रकारचा संसर्ग होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाते.
कंपनी चे संचालक श्री. दिप भोंग यांनी शेतकरी बांधव तसेच गृह उद्योजक व महिला याना आवाहन केले आहे शिवाय त्यांनी कंपनीचे भविष्यातील विस्ताराबाबत माहिती दिली सर्व शेतकरी बांधवाना कंपनी तर्फे आवाहन करण्यात आले आहे कि त्यांनी कंपनीशी संपर्क साधून त्यांनी त्यांचे कडे उपलब्ध असलेल्या फळे भाजीपाला या विषीयी नोंदणी करावी.
तसेच सर्व गृह उद्योजक व महिला उद्योजक कडून हि कंपनी त्यांनी बनवलेले खाद्यपदार्थ घेऊन ते भारतीय व भारता बाहेरील बाजारपेठे मध्ये उपलब्ध करणार आहे. त्यांना आपले खाद्यपदार्थ आता कंपनीद्वारे लोकांपर्यंत पोहोचवता येणार आहेत .त्यांना हि कंपनीशी संपर्क (७२१९११५८५८) साधून रजिस्टर होता येईल अशी माहिती देण्यात आली.
फ्रुटीजम्’ कंपनीने काही वर्षातच पुणे शहरात विस्तार केला आहे आणि मागणी व कंपनीची कार्यक्षमता बघता, आता देशांतर्गतच नव्हे तर देशाबाहेरही विस्तार करण्याचे कंपनीचे ध्येय आहे. सर्वांना बरोबर घेऊन मोठे होण्यास कंपनीने सदैव प्राधान्य दिले आहे. त्यामुळे देशात व देशाबाहेर केल्या जाणाऱ्या निर्यातीचा, बाजारपेठेत असलेल्या या मंदीच्या काळात सर्वांनाच फायदा होईल. देशाबाहेरील निर्यातीसाठी कंपनीने APEDA रेजिस्ट्रेशन व आवश्यक सर्व तरतुदी पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही तांत्रिक अडचणी शिवाय यशस्वी व फायदेशीर निर्यात होऊ शकेल.

पायसम फूड तर्फे पुणे ,मुंबई ,नागपूर ,नाशिक या शहरात फ्रॅंचाईजी देण्यात येणार असून त्या मार्फत लवकरात लवकर घरपोच सेवा देता यावी यासाठी कंपनी प्रयन्तशील आहे शिवाय कंपनी बंगलोर चेन्नई हैद्राबाद या शहरात लवकरच त्यांचे स्टोअर्स सुरु करणार आहे.
हा कंपनीचा उपक्रम फक्त नफ्यासाठी नसून सामाजिक जाणिवेतून उभा केला आहे. सर्वांनाच फायद्याचा आणि मदतीचा असल्यामुळे हा उपक्रम बहुउद्देशीय आहे. सरकारच्या COVID-19 विरोधी लढ्यात हा खारीचा वाटा आहे, आपल्या अन्नदात्याला संकटाच्या काळात मदतीचा हात देण्याचा प्रयत्न आहे, महिला आणि गृह उद्योजकांना या लॉकडाउनच्या काळात विकासाची संधी आहे. सर्व जनतेला कोणत्याही खाद्यपदार्थाची नड भासू नये, अगदी भाजी व फळांपासून ते चविष्ठ लोणच्यांपर्यंत कोणतीही गरज लवकर आणि अतिशय काळजीने हाताळण्यात येणाऱ्या घरपोच सेवेने व्हावी असा हा उपक्रम आहे.
या उपक्रमाच्या अनुषंगाने आपण सर्व जण एकत्र येऊन, येणाऱ्या आर्थिक मंदीवर मात करू शकतो. हा उपक्रम देशात व देशाबाहेर यशस्वी करून त्याचा लाभ संपूर्ण भारताला करून देऊ शकतो. या उपक्रमासाठी आणि अशा अनेक नवीन उपक्रमांतून सर्वांचा विकास साधण्यासाठी फ्रुटीजम्’ कंपनी नेहमी तत्पर आणि प्रयत्नशील आहे असे कंपनीने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Back to top button