अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजसामाजिक

बीड जिल्ह्यात आर्य वैश्य कुलस्वामिनी श्री वासवीमाता जन्मोत्सव घरीच साजरा करा― जिल्हाध्यक्ष गजानन डुबे

अंबाजोगाई:रणजित डांगे―
आर्य वैश्य समाजाची कुलस्वामिनी माता वासवी कन्यका परमेश्‍वरी मातेचा वैशाख शुद्ध 10 रविवार दि.3 मे रोजी जन्मोत्सव आहे. त्यानिमित्त सर्व समाज बांधवांनी आपापल्या घरीच सकाळी 9.00 ते 12.00 वाजे दरम्यान महापुजन करुन जन्मोत्सव साजरा करावा आणि मातेला साकडे घालावे की,जगासोबत आपल्या देशावर,राज्यावर आणि आपल्या गावावर घरावर मानवजातीवर आलेलं कोरोनाचे हे संकट टळू दे.समाजातील सर्वच घटकांना सुखी ठेव अशी प्रार्थना करावी असे आवाहन महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमारजी गादेवार यांच्या सुचनेनुसार आर्य वैश्य महासभेचे बीड जिल्हाध्यक्ष गजानन डुबे,कार्याध्यक्ष महेश रूद्रवार,सचिव संजीव डुबे,कोषाध्यक्ष सुमित रूद्रवार,प्रसिद्धीप्रमुख दत्तात्रय दमकोंडवार, महासभेचे सर्व पदाधिकारी, सर्व तालुक्याचे उपाध्यक्ष तसेच सर्व जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य यांच्या वतीने करण्यात आलेे आहे.

आर्य वैश्य समाजाच्या वतीने दरवर्षी श्री वासवी माता जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा होतो. परंतु,आता कोरोना सारख्या महाभयंकर स्थिती मध्ये आणि शासनाने व जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन जाहिर केल्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी आपल्या घरीच राहून आणि सोशल डिस्टन्सिंग पाळत हे महापुजन मोठ्या भक्ती भावाने करावे असे आवाहन ही करण्यात आले.