औरंगाबाद जिल्हाकोरोना विषाणू - Covid 19ब्रेकिंग न्युजसोयगाव तालुका

सोयगाव: कोरोना संसर्गाची सक्षम भिंत पोलीस आणि कोरोना योद्धा आरोग्य कर्मचार्यांना सोयगावात मास्क वाटप

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगावसह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सक्षम भिंत म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या पोलिसांना आणि महिनाभरापासून कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून राष्ट्रवादी कॉँग्रेस डॉक्टर सेलच्या वतीने सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स,आरोग्य कर्मचारी व तपासणी नाक्यावरील कार्यरत पोलीस कर्मचारी व शिक्षकांना फेस मास्क चे वाटप करण्यात आले.डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे,जिल्हाध्यक्ष डॉ.धैर्यशील पवार,यांनी हे पन्नास फेस मास्क उपलब्ध करून दिले.डॉक्टर सेलचे सोयगाव तालुकाध्यक्ष डॉ.दिनकर पिंगाळकर,राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र आहीरे,शहराध्यक्ष रविंद्र काळे,युवक तालुकाध्यक्ष राजेंद्र दुतोंडे यांनी हे फेस मास्क वाटप केले.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?