अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―येथील “शिक्षक-मैत्री” प्रतिष्ठान,अंबाजोगाई तर्फे कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गटशिक्षणाधिकारी कार्यालय,अंबाजोगाई येथे
गुरूवार,दिनांक 30 एप्रिल रोजी हॅन्डवॉश सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
सदरील हॅन्डवॉश सुविधेचे उद्घाटन पंचायत समितीचे सभापती पुत्र प्रा.प्रशांत जगताप.उपसभापती पुत्र अॅड.पटेल,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.संदीप घोणसीकर,गटशिक्षणाधिकारी रंगनाथ राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी विस्तारअधिकारी मधुकर सुवर्णकार,केंद्रप्रमुख माणिक सोळंके,प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेसाहेब सोमवंशी हे उपस्थित होते.यावेळी “शिक्षक-मैत्री” प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार यांनी प्रतिष्ठानने केलेल्या आज पर्यंतच्या कार्याविषयी व “शिक्षक-मैत्री” प्रतिष्ठाणच्या ध्येय धोरणांविषयी माहिती दिली.यावेळी “शिक्षक-मैत्री” प्रतिष्ठाणचे सचिव उमेश नाईक,उपाध्यक्ष अनुरथ बांडे,सदस्य दत्ता देवकते,वैजनाथ आंबाड,विष्णु सरवदे,सत्येंदु रापतवार, जगन्नाथ वरपे,विनायक चव्हाण,संदीप दरवेशवार,समाधान धिवार,खान अन्वर अली,शहाजी मगर,बाळासाहेब माने आदी उपस्थित होते.