परळी:आठवडा विशेष टीम― राष्ट्रीय महामार्ग परळी-वैद्यनाथ 548 ब पिंपळा धायगुडा रस्त्या संदर्भात गेली चार वर्षापासून काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांचा पाठपुरावा चालू असून दिनांक 20/4/ 2020 ला तात्काळ काम चालू करण्याचे वर्क ऑर्डर मिळाल्याची माहिती देण्यात आली सन 2017 ते 2019 पर्यंत या तीन वर्षाच्या काळात अनेक गुत्तेदार अधिकारी आले आणि गेले परंतु काम झाले नाही हे महाराष्ट्रातले राष्ट्रीय महामार्ग संदर्भात एकमेव ज्वलंत उदाहरण आहे शासनाकडून दक्षता पथक चौकशी करण्यासंदर्भात नेमले असून भ्रष्ट अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यास भाग पडणारच वसंत मुंडे यांनी पत्रकारांना सांगितले तात्काळ काम चालू करण्यासंदर्भात केंद्र सरकार कडून मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग सीबीडी बेलापूर मुंबई यांच्यामार्फत दि 20/4/2020 ला व संबंधित गुत्तेदार यांना वर्क ऑर्डर देण्यात आलेली आहे एकूण 133 कोटी 81 लाख रुपयाचे काम असून 25. 27% कमी दराने 99,99,99,999 ला औरंगाबाद येथील AGC RSBIPL या कंपनीला मिळालेले आहे शासनाचे 33 कोटी 82 लाख या कामांमध्ये पैसे वाचले आहेत सदर काम 25 . 27% कमी दराने सुटल्यामुळे कामाचा दर्जा उत्कृष्ट राहावा यासाठी थर्ड पार्टी म्हणून दूर्वा कंपनीने लक्ष घालने काळाची गरज आहे करिता कमी दराने काम घेतल्यामुळे गुत्तेदार व अधिकारी संगनमताने भ्रष्टाचार करण्याची दाट शक्यता आहे अगोदरच तीन वर्षापासून सर्व जनतेला जाण्यासाठी परळी अंबाजोगाई रस्ता हा गैरसोयीचा ठरला असून अपघात अनेक झाले आहेत धुळीमुळे वेगवेगळे रोग झाले असून विद्यार्थी कामगार कर्मचारी व्यापारी सर्वसामान्य जनता खूप मोठ्या प्रमाणावर त्रास सहन केला आहे तरी तात्काळ काम चालू करण्याचे कारवाई करण्यात यावी अशी शासनामार्फत आदेश संबंधित गुत्तेदार यांना दिल्याची माहिती काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन रोजगार मंत्रालय भारत सरकार यांनी पत्रकारांना दिली आहे जे कोणी बोगस बिले उचललेले आहेत त्यावर शासन स्तरावर कारवाई चालू आहे जनतेनेही परळी अंबाजोगाई रस्ता संदर्भात काम चालू असताना सतर्क राहणे काळाची गरज आहे वसंत मुंडे यांच्याकडून परिवहन मंत्री नितीन गडकरी व सार्वजनिक बांधकाम खात्याचे महाराष्ट्राचे मंत्री अशोकराव चव्हाण यांचे आभार मानले आहे सर्व स्तरावर कागदपत्रे पुराव्यासहित पाठपुरावा निदर्शनास शासनाकडे आणून दिल्यामुळे कामास गती आल्याची माहिती काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी दिली.