अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
कोरोना साथजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या संकटात मदत करण्यासाठी फक्त मनाची प्रामाणिक इच्छा आणि उदात्त हेतू हवा.सामाजिक संवेदना अंगी असेल तर कोणाला कुठेही व कुठून ही मदत करणे शक्य असते.हे पुन्हा एकदा दिसून आले.ते लिंगायत कोष्टी हटगर समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.किशोर गिरवलकर यांनी राज्यात लॉकडाऊन असताना अंबाजोगाईत बसून सोलापूर येथे विणकाम करणाऱ्या कामगारांना जीवनावश्यक किराणा साहित्याचेे किटस् उपलब्ध करून दिल्यामुळे अॅड.गिरवलकर यांनी दाखवलेल्या सामाजिक संवेदनाचे समाजातून कौतुक होत आहे.
लिंगायत कोष्टी हटगर समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.किशोर गिरवलकर यांनी मोबाईलवरून समाजातील दानशुर व्यक्ती,नौकरदार कर्मचारी यांना एकत्रित करून ही मदत हस्ते परहस्ते मिळवून दिली आहे.कोरोना या संकटात मानवी आज सर्वच स्तरांवर अडचणींचे डोंगर उभे राहत आहेत.वेगवेगळ्या ठिकाणी आणि हातावर पोट असणा-या मजुरांची तर उपासमार सुरूच आहे.पण,अशा ही परिस्थितीत काही दानशुर,अन्नदाते आणि सामाजिक संवेदनशील मनाने जगणारी माणसं आज समाजात मोठ्या प्रमाणावर पुढे येत असल्याने गोरगरिबांना अशा संकटात चार घास मिळत आहेत.अॅड.गिरवलकर यांच्या सारखी समाजस्नेही माणसं अशा संकटकाळात धावून येत असल्याने गरजूंना मदत व दिलासा मिळत आहे.अॅड.किशोर गिरवलकर हे राष्ट्रीय हटगार लिंगायत कोष्टी समाजाचे अध्यक्ष आहेत.महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कोनाकोपऱ्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे.समाज संघटन आणि समाजाचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी ते ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता आहोरात्र परिश्रम घेतात.महाराष्ट्रातील सोलापूर,कोल्हापूर,कर्नाटक या भागात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे.कोरोना साथजन्य रोगाचे हे संकट सुरू झाल्यानंतर सोलापूरच्या अाशानगर भागांत कपडा मिल मध्ये हातमाग कामगार म्हणून काम करणा-यांची मोठ्या प्रमाणावर उपासमार सुरू होती.या संदर्भातली माहिती अध्यक्ष अॅड.गिरवलकर यांना मिळताच त्यांनी त्याच परिसरातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दूरध्वनीवर काही महत्त्वाच्या सूचना दिल्या.संपूर्ण माहिती घेतली.ज्या कामगारांना खाण्यापिण्यासाठी काही जीवनावश्यक साहीत्य नव्हते अशा जवळपास 43 कामगार कुटूंबांना-लोकांना अॅड.गिरवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली किराणा साहित्याचे किटस् वाटप करण्यात आले.सांगायचं तात्पर्य एवढेच आहे.की,कधी ना कधी संकट हे प्रत्येकावरच असतं अशावेळी फक्त मानवतावादी दृष्टिकोनातून गरजू आणि गोरगरिबांना मदत करणं हाच खरा धर्म आहे.गिरवलकर यांनी परोपकार भावनेतून अंबाजोगाईत बसून सोलापूर येथे विवंचनेत सापडलेल्या लोकांना केलेली मदत ही खऱ्या अर्थाने इतरांना प्रेरणा आणि आदर्श देण्यासारखी आहे.या संदर्भात अॅड. गिरवलकर यांनी स्वतः कुठल्याही प्रकारची वाच्यता केली नसली तरी त्यांच्या पुढाकाराने झालेल्या मदतीची नोंद घेतली पाहिजे.समाजातील काही मान्यवर मित्रांनी बोलताना सांगितले की,अॅड.गिरवलकर यांचे समाजकार्य आणि संघटन कार्यासाठी कायमच पुढाकार असतो.अधून-मधून ते संघटनेच्या कामासाठी राज्यात व परराज्यात सर्वदूर दौ-यावर असतात.समाजाचे प्रश्न तळमळीने सोडवतात.अनेकांना ते सढळ हस्ते मदत करतात.त्यांनी सोलापूर येथे विणकाम करणाऱ्या हातमाग कामगारांना जीवनावश्यक किराणा साहित्याचेे किटस् उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांच्या या भुमिकेचे समाजाच्या वतीने कौतुक केलं जात आहे.