सोयगाव दि.०२:आठवडा विशेष टीम―सोयगाव तालुक्यातील किन्ही गावचे सुपुञ यांनी लहान वयात समाजकार्य करून पुरस्कार मिळाल्याबद्दल तालुक्यामध्ये समाधान शिंदे यांच्या नावाची चर्चा होत आहे.
श्री.समाधान ऱामचंद्र शिंदे-पाटील..
यांना त्यांच्या समाजकार्यांची दखल घेत मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (मुंबई) यांच्या तर्फे सामाजिक कार्यासाठी देण्यात येणारा *” राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार 2020”* जाहीर करण्यात आला आहे.मराठा प्रतिष्ठान अध्यक्ष सोपान दादा, विजय काळे,यादवकुमार शिंदे,ज्ञानेश्रर युवरे पाटील,समाधान जाधव,सचिन महाजन,व घोसला गावचे सरपंच प्रकाश पाटील,यांनी समाधान शिंदे यांना फोन वरुन शुभेच्छा मराठा प्रतिष्ठान सोयगाव तर्फे हार्दीक अभिनंदन व पुढील कार्यासाठी मन:पुर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.