सोयगाव,दि.२:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
मुलीच्या भेटीसाठी गेलेल्या आईचा लॉकडाऊन मध्ये अडकल्याने मुंबईत शनिवारी पहाटे मृत्यू झाला.परंतु लॉकडाऊन मुळे तिच्या पतीला व मुलाला सोयगाव तालुक्यातील कंकराळा गावातून मुंबईला जाता आले नसल्याने अखेरीस पतीला पत्नीचे व मुलाला आईचे अंत्यदर्शन आॅनलाईन घेवून कंकराळा ता.सोयगाव गावातून आॅनलाईन अंत्ययात्रेत कुटुंबाला सहभागी व्हावे लागले.तर मुंबईला मुलीला आईच्या पार्थिवाला अग्निडाग द्यावा लागला.
कंकराळा ता.सोयगाव येथील महिला माजी सरपंच शांताबाई संतोष शिंदे(वय ५५)या महिनाभरापासून मुंबईला(उल्हासनगर)येथे मुलीला भेटीसाठी गेल्या असता,कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊनमुळे रेल्वेसेवा बंद असल्याने या महिलेला कंकराळा गावात येता आले नव्हते,परंतु शनिवारी अचानक त्यांचा मुंबईला मृत्यू झाल्याची माहिती कंकराळा गावात येताच शिवसेना तालुकाप्रमुख दिलीप मचे यांनी या कुटुंबाला मुंबईला हलविण्यासाठी परवानगीचे मोठे प्रयत्न केले,परंतु अखेरीस परवानगी मिळत नसल्याचे पाहून त्यांनी व्ही.डी.ओ कॉल द्वारे पतीला पत्नीचे व मुलाला आईचे अंत्यदर्शन करून आॅनलाईन अंत्ययात्रेत थेट मुंबईला जोडणी करण्यात आली होती.त्यामुळे पती संतोष शिंदे,मुलगा अनिल शिंदे आणि सून शशिकला शिंदे यांना मुंबईतील आॅनलाईन यात्रेत कंकराळा गावातून सहभागी व्हावे लागले.लॉकडाऊनमुळे या कुटुंबाला मुंबईला जाता आले नसल्याने या कुटुंबीयांनी कंकराळा गावातच मृत महिलेला साश्रू नयनांनी आॅनलाईन निरोप दिला.
——————————
शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिलीप मचे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेशी दूरध्वनीवरून या कुटुंबियाला सोयगाव तालुक्यातून मुंबईला पाठविण्याबाबत परवानगी देण्याबाबत मागणी केली परंतु अखेरीस प्रयत्नांना यश न आल्याने घरूनच या कुटुंबियांना आॅनलाईन अंत्ययात्रेत सहभागी व्हावे लागले.