बीड जिल्हाशेतीविषयक

कृषी अधिकारी सह अनेक खुर्च्या रिकाम्या ; परळी कृषी कार्यालयाचा महाप्रताप

परळी कृषी कार्यालयातील प्रकारामुळे शेतकरी त्रस्त

शेतकरी कार्यालयाच्या दारात पण खुर्च्या रिकाम्या ; जिल्हा कृषी अधिकारीयांनी लक्ष देण्याची मागणी- गौतम साळवे

परळी वै. दि.०१:- तालुक्यातील कृषी अधिकारी कार्यालयात नेहमीच कोणतेना कोणते कारण सांगून अनेक कर्मचारीविना खुर्ची रिकाम्या असतात. कृषी अधिकारी व कर्मचारी यांना शेतकऱ्यांचे काही घेणे देणेच नाही. मंडळ कृषी अधिकारी कार्यालयात तर दुपारच्या नंतर कामकाजात सुरूवात होती. कृषी अधिकारी कार्यालयाचा भोंगळा कारभार सुरू असल्याने या सर्व कर्मचारी वैयक्तिक लक्ष केंद्रित करून जिल्हा कृषी अधिकारी चपळे यांनी कडक कारवाई करावी अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे तालूकाध्यक्ष गौतम साळवे यांनी केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,

सरकारी बाबुंचा कारभार अनेकदा चर्चेचा विषय असतो परंतु सध्या राज्यात व मराठवाड्यात दुष्काळजन्य परिस्थितीत तरी अधिकारी व कर्मचारी गांभीर्याने लक्ष देऊन काम करतील अशी जनतेची अपेक्षा धुळीस मिळविण्याचे काम परळी कृषी कार्यालयात केले जाते. वेगवेगळ्या कामांच्या संदर्भात कार्यालयात जाणाऱ्या शेतकऱ्यांना रिकाम्या खुर्चीकडून पाहून परतण्याची वेळ येते. परळी कृषी कार्यालयात घोरनिराशा करत शेतकऱ्यांना माघारी परतावे लागते.
दुष्काळी परिस्थितीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकार कृषी कार्यालयामार्फत करते. परंतु परळीतील तालुका कृषी कार्यालयात मात्र शेतकऱ्यांना रिकाम्या खर्चीकडे पाहून त्रस्त होण्याची वेळ आली आहे. दुष्काळी परिस्थितीत विविध योजनांची माहिती सांगण्यासाठी वेळ नाही. पण इतर कामासाठी वेळ आहे. अनेक कर्मचारी यांना मोबाईल खेळण्यासाठी वेळ पण शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी वेळ मिळत नाही. शेतकऱ्यांना दिलासा देण्या ऐवजी पिळवणूक करतांना हमखास चित्र स्पष्ट दिसत आहेत. यासर्व प्रकाराकडे उत्तर देण्यासाठी देखील कोणाकडे वेळ नाही. नसल्याचे सदर शेतकऱ्यांनी अनेक वेळा तक्रारी दाखल केल्या आहेत. तरी या सर्व बाबीकडे प्रशासनाने वेळीच लक्ष घावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भारिप बहुजन महासंघाचे तालूकाध्यक्ष गौतम साळवे यांनी दिला आहे.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.