अहमदनगर जिल्हाकोरोना विषाणू - Covid 19पाथर्डी तालुकाब्रेकिंग न्युज

पाथर्डी तालुक्यातील ४५ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण ;जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या ४४

अहमदनगर, दि. ०२:आठवडा विशेष टीम― पाथर्डी तालुक्यातील मोहोज देवढे येथील ४५ वर्षीय व्यक्तीला कोरोणाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेला या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही व्यक्ती शेतमाल घेऊन मुंबईला गेल्याचे स्पष्ट झाले असून त्यानंतर त्याला त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ४४ झाली आहे. दरम्यान, गेल्या ५-६ दिवसानंतर जिल्ह्यात पुन्हा कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्याने जिल्ह्याच्या सीमेवरील नाकेबंदी कडक करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत.

दरम्यान, जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आतापर्यंत १५५९ व्यक्तींचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील १४८१ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव आले आहेत. आजच्या बाधीत रुग्णामध्ये आता कोरोना बाधिताची संख्या ४४ झाली आहे. त्यापैकी २५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून आता हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १७ झाली आहे. त्यापैकी एक जण ससून रुग्णालयात उपचार घेत आहे तर ०२ बाधीत व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

काही दिवसापूर्वी मोहन देवढे गावातील ही व्यक्ती त्याच्या शेतातील शेतमाल घेऊन मुंबईला गेली होती. तेथून परतल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काल त्यांच्या घशातील स्त्राव घेऊन पुण्याला तपासणीसाठी प्पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. दरम्यान जिल्हा प्रशासनाने तात्काळ तालुका प्रशासनाला आदेश देऊन या बाधित व्यक्तीच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्तीनं शोधून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितले आहे. तसेच गावाचा परिसर सील करून तपासणी मोहिम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

गेल्या ५-६ दिवसानंतर जिल्ह्यात पुन्हा बाधीत रुग्ण आढळल्याने सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी दिल्या आहेत. विनापरवानगी कोणालाही जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश देण्यात येऊ नये,. अधिकृत परवानगी असेल त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी तसेच जिल्हा हद्दीत प्रवेश केल्यावर त्यांना संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत.

बाहेरच्या जिल्ह्यातून आणि परराज्यातून अहमदनगर जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे अधिक दक्षतेने जिल्हा सीमेवर तपासणी गरजेची आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

*कोटा आणि माऊंट अबू येथून विद्यार्थी आणि प्रवासी जिल्ह्यात दाखल*

दरम्यान, काल रात्री कोटा (राजस्थान) येथून ३२ विद्यार्थी नगरमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या बसने दाखल झाले. त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना संस्थात्मक देखरेखीखाली संबंधित तालुक्यात ठेवण्यात आले.

आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यासोबतच सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथील विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसेस ही नगरमध्ये जात होत्या. यावेळी जिल्हा पोलिस दल आणि घर घर लंगर परिवाराच्या वतीने या विद्यार्थ्यांना फूड पॅकेट, पाण्याची बाटली सोबत देण्यात आली. त्यामुळं हे विद्यार्थीही भारावले आणि त्यांनी एसटी महामंडळ, पोलिस विभाग आणि जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.

माऊंट अबू येथे कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील १११ भाविक गेले होते. त्यांचेही काल जिल्ह्यात आगमन झाले. जिल्ह्याच्या चेकपोस्ट वर तसेच तालुका सीमेवर त्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना संस्थात्मक देखरेखीखाली संबंधित तालुक्यात ठेवण्यात आले.

*परराज्यातील ५० प्रवासी त्यांच्या गावाकडे रवाना*
*आपुलकीने सांभाळ केल्याबद्दल मानले प्रशासनाचे आभार*

दरम्यान, केंद्र शासनाने जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात अडकलेल्या विविथ स्थलांतरित मजूर, विद्यार्थी, इतर नागरिक यांना त्यांच्या राज्यात पाठविण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला. जिल्हा प्रशासनाने त्यासाठी खास पथकाची स्थापना केली.जिल्ह्यात विविध ठिकाणी तसेच निवारागृहात अडकलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करण्यात येत आहे.

आज रात्री नगरहून राजस्थानसाठी प्रवासी बस रवाना करण्यात आली. लॉकडाउन काळात या बसेस मधील प्रवासी विनापरवाना जात असताना५० व्यक्तींना ताब्यात घेऊन निवारा गृहात दाखल करण्यात आले होते. शहरातील बडी साजन ओस्वाल मंगल कार्यालय या ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्यात आली होती.
आज त्यांना त्यांच्या घरी जाण्यास मिळणार असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. जिल्हा प्रशासनाने अतिशय आपुलकीने काळजी घेतल्याबद्दल यंत्रणेतील प्रत्येकाचे त्यांनी आभार मानले.

दिनांक २७ मार्च रोजी अहमदनगर जिल्हा प्रशासनाच्या भरारी पथकाच्या माध्यमातून कडप्पा, आंध्रप्रदेश येथून राजस्थान कडे जाणाऱ्या या 50 जणांना नगर मध्ये प्रवेश करतेवेळी ताब्यात घेण्यात आले होते. येथे त्यांची राहण्या-खाण्याची व इतर वैद्यकीय सुविधांची सोय करण्यात आली होती. बडी साजन ओसवाल श्री संघ व सकल राजस्थानी युवा मंच यांनी यासाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य केले. या नागरिकांना आज राजस्थानमधील जालोर, बाडमेर या जिल्ह्यांमध्ये शासकीय नियमाप्रमाणे रवाना करण्यात आले. यामध्ये ४६ पुरुष व ०२ महिला तसेच ०२ लहान मुले आदी ५० जण होते. त्यांच्यासमवेत असलेल्या आंध्रप्रदेश येथील वाहनचालकांना उद्या, दिनांक ०३ मे रोजी सोडण्यात येणार आहे. त्याबरोबरच राजस्थानमधील करोली जिल्ह्यातील सुमारे 15 नागरिकांना रवाना करण्याची प्रक्रिया 3 मे रोजी संपन्न होणार आहे.


Back to top button