हॉट स्पॉट वसाहतीमध्ये शासनाकडून जीवनावश्यक वस्तू व औषधी पुरवठा करा ―डॉ.संदीप घुगरे

जन क्रांती संघ ची मागणी

औरंगाबाद:आठवडा विशेष टीम―मागील 2 महिन्यापासून राज्यभरात शासनाकडून लॉक डाऊन घोषत करण्यात आले आहे,दुर्देवाने औरंगाबाद शहरात कॉरोना चे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच असल्याने औरंगाबाद शहर रेड झोन मध्ये गेले आहे, औरंगाबाद शहरातील किलेंअर्क,भीमनगर-भावसिंगपूरा,टाऊन हॉल,आरेफ कॉलनी,बायजीपुरा,जय भीमनगर,संजय नगर मुकुंदवाडी,आशा अनेक वसाहती मध्ये सतत रुग्ण संख्या वाढत असल्याने या परिसर मध्ये हॉट स्पॉट म्हणून घोषत केले आहेत परिणामी या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे दैनंदिन सर्व प्रकारचे व्यवहार बंद करण्यात आले आहेत जे उपाय योजनेच्या दृष्टीने स्वागतार्ह आहे परंतु सदरच्या वसाहती ह्या गजबजलेल्या वसाहती आहेत व हजारो नागरिक ह्या वसाहतीमध्ये वास्तव्यास आहेत, येथिल वसाहत हॉट स्पॉट घोषित केली असल्याने नागरिक मोठया प्रमाणात तणावाखाली आहेत शिवाय दैनंदिन सर्व प्रकारचे व्यवहारावर निर्बंध घालण्यात आल्याने लोकांना जीवनावश्यक वस्तू मिळणे कठीण झाले आहे,या वसाहतीमध्ये अनेक कुटुंबात वृध्द, लहान बाळ,मधुमेह,उच्च रक्तदाब आदी आजाराचे नागरिक मोठ्या प्रमाणात आहेत,या सर्वाना रोजच्या आहारा सोबत गोळ्या,औषधी,लहान मुलांना दूध,किराणा माल यांची गरज असते परंतु येथील सर्वच व्यवहार बंद असल्याने यांच्या जीवनावर यांचा परिणाम होत आहे,अगोदरच मानसिक तणावाखाली असणारे नागरिक आता हातबाल झाले आहेत,उच्च रक्तदाब, मधुमेह व इतर व्याधींणी ग्रस्त नागरिकांची प्रकृती चिंतेमुळे खालावत असल्याचे दिसून येते आहे,
आपल्या शहराचे नागरिक या नात्याने यांच्या अडचणीत यांना योग्य ती वाजवी आर्थिक,सामाजिक मानसिक मदत करणे हे प्रशासन म्हणून आपले कर्तव्य आहे तरी आपण घोषित केलेल्या हॉट स्पॉट वसाहती मध्ये जीवनावश्यक वस्तू ,औषधे याचा शासन स्तरावर पुरवठा करून नागरिकांना दिलासा दयावा जेणे करून विनाकारण नागरिक घराबाहेर पडणार नाही व लॉक डाऊन राबविण्यात कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्या अशी विनंती जन क्रांती संघ चे संस्थापक अध्यक्ष डॉ संदीप घुगरे यांचया नेतृत्वाखाली युवा संघटक किरण लिंगायत,दादाराव नजन,दिनेश गवळे,ज्ञानेश्वर भावले,विष्णू वखरे,ओबीसी नेते विशाल नांदरकर,धनगर समाज क्रांती मोर्चा चे शिवाजी नेमाने, दीपक महानवर,कृष्णा तोतरे,गणेश तोतरे ,जन क्रांती संघ महिला संघटक लता गायकवाड, सिद्धार्थ दाभाडे,यांनी अन्न पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ साहेब,पालकमंत्री औरंगाबाद, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका आयुक्त औरंगाबाद यांना ईमेल करून विनंती केली आहे.

Previous post पाथर्डी तालुक्यातील ४५ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण ;जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या ४४
Next post परळी: दाऊतपुर शिवारात एका युवकाने घेतला गळफास