शहिद स्मारकाचा निधि सरपंचाच्या गैरहजेरीत लाटण्याचा ग्रामविकास अधिकाऱ्याचा प्रयत्न ,वीरपत्नीचा ग्रामस्थांसह पुन्हा उषोषणाचा ईशारा ―डॉ गणेश ढवळे


बीड:आठवडा विशेष टीम―वीरपत्नी श्रीमती साधना शिवाजी शिंदे , मुलगा कार्तिक ,मुलगी शितल ग्रामस्थांसह लिंबागणेश येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली मंजूर झालेला शहिद स्मारकाचा निधी ग्रामविकास अधिकारी तेलप यांनी सरपंचाच्या वैद्यकीय गैरहजेरीत आधीच भ्रष्टाचार झालेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पामधे( आर ओ ) यंत्र बसवण्याचे कारण दाखवून लाटण्याचा प्रयत्न , वीररपत्नीचा मुलाबाळांसमवेत ग्रामस्थांसह डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा उपोषणाचा ईशारा.

श्रीमती साधना शिवाजी शिंदे ( वीरपत्नी ):

डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली कार्तिक ,शितल आणि ग्रामस्थांसह जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन केले होते, त्यानंतर स्मारकासाठी निधी मंजूर झाला,आता आम्हाला कळाले की ग्रामविकास अधिकारी तेलप यांनी स्मारकाच्या कामाचा २ लाख ५० हजार रू.निधि स्मारक न बांधता ईतरत्र वळवला आहे, आम्ही पुन्हा डां.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली उपोषणाला बसणार.

कार्तिक शिवाजी शिंदे (शहिदाचा मुलगा ) :

मी ग्रामसेवक तेलप यांना विचारले असता त्यांनी एका इंजिनियरशी मोबाईल फोन वर बोलणे करून दिले.त्यांनी सांगितले ग्रामविकास अधिकारी तेलप म्हणतात त्याप्रमाणे शहिद स्मारकासाठी निधी मंजूर होत नाही.

शितल शिवाजी शिंदे (शहिदाची मुलगी):

ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करून शहीद स्मारकासाठी आणलेला निधी जर ग्रामविकास अधिकारी मनमानी पद्धतीने रद्द करत असेल तर पुढील निर्णय ग्रामस्थांनी घ्यावा.आम्ही मात्र पुन्हा उषोषणाच्या तयारीत आहोत.



डॉ.गणेश ढवळे,सामाजिक कार्यकर्ते, लिंबागणेश :

शहिद शिवाजी शिंदे यांच्या स्मारकासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते, ग्रामविकास अधिकारी तेलप यांच्या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराला लिंबागणेशकर कंटाळले असून शहिद स्मारकासारख्या भावनिक विषयाचा बाजार मांडणा-या ग्रामविकास अधिका-यांच्या निलंबनाची मागणी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी बीड , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड मार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री , ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना वीरपत्नी श्रीमती साधना शिवाजी शिंदे ,शहिद शिवाजी शिंदे यांचा मुलगा कार्तिक शिवाजी शिंदे , मुलगी शितल शिवाजी शिंदे भाऊ सतिश रंगनाथ शिंदे , विक्रांत वाणी ,मयुर वाणी , अभिजित गायकवाड , अशोक वाणी , चंद्रकात रमेश शिंदे, अमोल जाधव , दिपक ढवळे , आदि.उपस्थित होते.