अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
शासनाच्या याेजनांपासून वंचित असणा-या गाेरगरीब व गरजू अशा सुमारे 4 हजार कुटुंबांना बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या वतीने नियाेजनबध्दरित्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.यामुळे लॉकडाऊनच्या काळात गोरगरीब कुटुंबांना दिलासा
मिळाला आहे.
लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणारे,छोटे व्यवसाय करणारे समाज बांधव आज उपासमारीच्या विळख्यात सापडले आहेत.राज्य व केंद्र सरकार देखील युद्ध पातळीवर मदतीचे प्रयत्न करीत आहे.अशा परिस्थितीत गरजूंना मदत व आपत्तीच्या काळात सरकारला सहकार्य केले पाहिजे या विधायक भूमिकेतून बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी गेल्या 15 ते 20 दिवसांत अंबाजोगाई शहरातील सर्व प्रभाग व ग्रामीण भागात सुमारे 4 हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट्स तयार करून ते घरपोहोच वाटप करण्यात आले.या कीटमध्ये गव्हाचे पीठ (आटा),तांदूळ,साखर,तेल,मीठ व दाळ या वस्तूंचा समावेश आहे. लॉकडाऊनच्या काळात गोरगरीब कुटुंबीयांच्या चुली पेटल्याने भूकेचा प्रश्न तूर्त सुटल्याने आधार मिळाला आहे.काँग्रेस कार्यकर्त्यांनी शासनाचा लाॅकडाऊन तसेच साेशल डिस्टन्सिंगचा काटेकाेरपणे पालन करण्याचा निर्धार केला असून,घरात बसा,काेराेना पळवा हा संदेश यानिमित्ताने दिला आहे.राज्याचे महसुलमंञी तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात,सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण,वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासरावजी देशमुख यांचे सुचनेवरून बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्यावर नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी काेराेना साथजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले लाॅकडाऊन तसेच शासनाच्या साेशल डिस्टन्सिंग काटेकाेरपणे पालन करण्याचा निर्धार केला आहे.या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे शहराध्यक्ष महादेव आदमाने,नगरसेवक मनोज लखेरा,वाजेद खतीब,आसेफोद्दीन खतीब,अमोल लोमटे,सुनील व्यवहारे,धम्मपाल सरवदे,राणा चव्हाण,माणिकराव वडवणकर,खालेद चाऊस,सज्जन गाठाळ,गणेश मसने यांच्यासह अनेकांनी पुढाकार घेतला.”नागरिकांनो कृपया घरी बसा,मास्क वापरा,सोशल डिस्टन्स पाळा आणि काेराेना पळवा.”हा संदेश या वेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आला.
*गरजू कुटुंबांना मिळवून देणार शासकीय याेजनांचा लाभ*
काँग्रेस पक्षाच्या वतीने गरजू,गाेरगरीब अशा 4 हजार कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे व अन्नधान्याचे किट तयार करून घरपाेहोच वाटप करण्यात आले.केंद्र शासन तसेच राज्य शासन यांनी काेराेना सारख्या महामारी राेगावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकांसाठी लाॅकडाऊन तसेच साेशल डिस्टन्सिंग लागू केला आहे.राज्यातील जनतेने काेराेनाला हरविण्याचा निर्धार केला असून सामुदायिक लढा उभारला आहे.परंतु,काेराेनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असल्याने हातावर पोट असणा-या गरीब मजूर वर्गासमाेर कुटुंबीयांचा उदरनिर्वाह कसा करायचा असा माेठा प्रश्न पडला आहे.शेतात राेजमजुरीवर काम करणा-या सालगड्यांना शिधापत्रिका ही नाही.तसेच शासनाच्या विविध याेजनांचा लाभ ही मिळत नाही.अशा व्यक्ती व गरजू कुटुंबांना मदत व सहकार्य करून शासनाच्या विविध याेजनांचा लाभ मिळवून देणार आहोत.
*-राजकिशोर मोदी (अध्यक्ष,बीड जिल्हा काँग्रेस कमिटी.)*