बीड दि.२८:- आगामी सार्वत्रिक निवडणुक २०१९ च्या पूर्व तयारी कामाची आढावा बैठक बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहामध्ये जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी एम.डी.सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर जिल्हाधिकारी बी.एम.काबंळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे,अजित बोराडे,निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी,गणेश निऱ्हाळी, प्रियंका पवार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज नीला यांच्यासह उपविभागीय अधिकारी,पोलीस अधिकारी, तहसिलदार,नायब तहसिलदार,सर्व विभाग प्रमुख, नोडल अधिकारी (निवणडूक कक्ष) बीड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी एम.डी.सिंह यांनी आगामी सार्वत्रिक निवडणूक नजिकच्या कालावधीमध्ये प्रस्तवित असल्याने त्या अनुषंगाने विविध कामाबाबतची तयारी व त्याच्या तयारीसाठी नोडल अधिकारी यांची नेमणूक करणे गरजेचे असल्याने या कामाबाबत तात्काळ कार्यवाही करण्यासाठी आचारसंहिता विभागाचे नोडल अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे यांची नेमणूक करण्यात आली.
मनुष्यबळ व्यवस्थापन कक्षासाठी उपजिल्हा समन्वयक मग्रारोहयो चे महेंद्रकुमार कांबळे, मनुष्यबळ व ईव्हीएम रॅन्डामायझेशन ॲप साठीची माहिती तयार करणे, भारत निवडणूक विभागाने तयार केलेल्या ॲप चा विभाग आयसीटी चे कामकाजासाठी प्रविण चोपडे,सुनिल खुळे, ईव्हीएम/व्हीव्हीपॅट कक्षसाठी शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य एम.आर. लोहकरे, साहित्य व व्यवस्थापन कक्षासाठी तहसिलदार(सामान्य) अतुल वाघमारे, निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्षासाठी जिल्हा कोषागार अधिकारी श्रीरंग भुतडा व आयकर अधिकारी धिरेंद्र रंगदळ, वाहन, वाहतूक व संपर्क व्यवस्थापन कक्षासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) धन्वतकुमार माळी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजीव बागरी, बीएसएनएलचे उपविभागीय अभियंता आर.एस. हंगे, स्वीप कार्यक्रम अंमलबजावणी कक्षासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) सुनिल भोकरे, माध्यम संनियत्रंण व प्रमाणिकरणे कक्षासाठी (MCMC) जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप व माहिती अधिकारी किरण वाघ, कायदा व सुव्यवस्था समन्वय कक्षासाठी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रशिक्षण व्यवस्थापन कक्षासाठी उपजिल्हाधिकारी श्रीमती प्रियंका चाटे, सोशल मिडीया कक्षासाठी एनआयसीचे प्रविण चोपडे व महेश गोले, जिल्हा संपर्क कक्षासाठी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार काबंळे तर ईटीपीबीएस कक्षासाठी शिक्षणाधिकारी राजेश गायकवाड यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सर्व नोडल अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या कामकाजाबाबत तात्काळ माहिती करुन घ्यावी व त्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ व साहित्य उपलब्ध करुन घ्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी एम.डी.सिंह यांनी नियुक्त नोडल अधिकाऱ्यांना दिल्या.