पाटण:विठ्ठल कळके―
सध्या संपुर्ण जगावर कोरोनाचे संकट उद्धवले आहे. त्यामुळे यावर्षी शाळा व महाविद्यालय १५ मार्च नंतर बंद झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा झालेल्या नाहीत. आता विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन घेण्याचा घाट घातला जात आहे. परंतु ग्रामीण व शहरी भागातील अनेक विद्यार्थांकडे इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसल्याने व अनेक विद्यार्थी गरीब असल्याने त्यांच्याकडे मोबाईलची व्यवस्था देखील उपलब्ध नाही. रोजगार बंद असल्याने पैसे देखील नाहीत अशा अनेक समस्या असल्याने ऑनलाइन परीक्षा घेणे अत्यंत कठीण होऊ शकते. यामुळे ऑनलाइन परीक्षा घेण्यात येऊ नये विद्यार्थांना पुढील सत्रात प्रवेश देण्यात यावा म्हणुन सर्व परीस्थिती लक्षात घेता शासनाने आणि महाविद्यालयांनी विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा अशी मागणी सुर्या ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सुमित नवलकार यांनी ईमेलद्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री उदय सामंत, कुलगुरुना यांना केली आहे.