बीड:आठवडा विशेष टीम― लॉक डाऊन 3 म्हणजे 3 ते 17 मे दरम्यान ज्या दुकानांना व्यवसाय सुरू करण्याची परवानगी अडीच तासासाठी देण्यात आली आहे त्यांना पास ची गरज नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
लॉक डाऊन दरम्यान कोणत्या गोष्टींना सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे याची माहिती प्रशासनाने दिल्यानंतर पास कोठून घ्यायचा याची माहिती नगर परिषद प्रशासनाने दिली,व्यापाऱ्यांनी पास साठी कागदपत्रे गोळा करण्यास सुरवात केली ,दरम्यान जिल्हा प्रशासनाने एक नवीन आदेश काढत ज्या दुकानांना सात ते साडेनऊ दरम्यान व्यापार करण्याची मुभा दिली आहे त्यांना कोणत्याही पास ची गरज नाही,त्या वेळे व्यतिरिक्त काम असेल तर पास लागेल अस सांगण्यात आलं आहे,त्यामुळे दुकानदारांना पास लागणार नाही हे स्पष्ट झाले आहे.