वर्तमानपत्र व वृत्तवाहिन्यांचे वार्तांकन जिल्हा व प्रशासनासाठी कौतुकास्पद- जिल्हाधिकारी शेखर सिंह

पाटण:विठ्ठल कळके―
वर्तमानपत्र आणि वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून आपल्या जिवाची परवा न करता सर्व पत्रकार मित्र सर्व सामान्य माणसांपर्यंत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना जिल्हास्तरावर राबवल्या जात आहेत त्याचं वार्तांकन करत आहेत हे कौतुकास्पद असून आत्तापर्यंत जे जिल्हा प्रशासनाला सहकार्य केले यापुढेही असे सहकार्य करावे अशी अपेक्षा सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यक्त केली.
वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी सकारात्मक भूमिका घेऊन गेल्या ४० ते ५० दिवस कोरोना विषाणू संदर्भात जिल्हा प्रशासन राबवित असलेल्या उपायोजनांची तसचे कोरोना संसर्गाबाबत चांगल्या पद्धतीने जनजागृती केली आहे. पत्रकारांनी वार्तांकन करताना मास्क घालून बाहेर पडावे तसेच सुरक्षित अंतर ठेवून वार्तांकन करावे. कुठल्याही प्रकारची जोखीम पत्करु नये व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहनही सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

Previous post #CoronaVirus धनंजय मुंडेंचे बीड जिल्ह्यासाठी मिशन १००% ग्रीन झोन
Next post पालकमंत्री धनंजय मुंडे ,मोफत किराणा किट तर राहुद्या अधिकाऱ्यांना नुसतं भेटायला तरी सांगा, घारगाव ऊसतोड मजुरांची कैफीयत– डॉ.गणेश ढवळे