सोयगाव,दि.०४:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
घोसला गावापासून जवळच असलेल्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे नुकताच कोरोनाचा मृत्यू झाल्याने कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या पाचोरा तालुक्यापासून जवळच असलेले सोयगाव तालुक्यातील घोसला ग्रामपंचायत सतर्क झाली असून या ग्रामपंचायतीने घराघरात ग्रामस्थांना जनजागृती करून आरोग्य विषयक काळजी घेण्याबाबत जनजागृती करून गावात प्रत्येक घरात सॅनिटायझर मोफत वाटप केल्याने या गावातील प्रत्येक नागरिकाला सॅनिटायझर वापरायला मिळत आहे.
घोसला ग्रामपंचायतीच्या सरपंच भारती पाटील,ग्रामसेवक समाधान मोरे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने हा उपक्रम हाती घेवून गावात ठिकठिकाणी स्वच्छता,फवारणी करून प्रत्येक नागरिकाला सॅनिटायझर,मास्क वितरण केले.तसेच कोरोना संसर्गात सक्षम भिंत म्हणून काम करणाऱ्या पोलिसांच्या आरोग्याचीही काळजी घेणे कर्तव्य समजून सोयगाव पोलीस ठाणे,पंचायत समिती कार्यालय आदी ठिकाणीही मोफत सॅनिटायझर,मास्क वितरण करण्यात आले यावेळी सरपंच पती प्रकाश पाटील,ग्रामसेवक समाधान मोरे यांच्या हस्ते पोलीस ठाणे,पंचायत समिती आदी ठिकाणी वितरण करण्यात आले.
घोसला ग्रामपंचायतीने गावाच्या आरोग्याची देखभाल हा उपक्रम स्तुत्य आहे.यामुळे ग्रामस्थांचे मनोधर्य वाढेल आणि त्यातून कोरोना विषयक भीती दूर होण्यास मदत होईल त्यामुळे ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे स्वागत आहे.या उपक्रमाबद्दल ग्रामविकास मंत्री यांना मराठा प्रतिष्ठानच्या वतीने शिष्टमंडळासह भेट घेवून माहिती देण्यात येईल.
―सोपान दादा गव्हांडे
संस्थापक अध्यक्ष मराठा प्रतिष्ठान