औरंगाबाद जिल्हाकोरोना विषाणू - Covid 19ब्रेकिंग न्युजसोयगाव तालुका

सोयगाव: लॉकडाऊनच्या झोन बाबत ग्रामीण भागात संभ्रम ,नागरिकांची वर्दळ अचानक वाढली

सोयगाव,दि.४ :ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
रेड झोनमध्ये असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील; ग्रामीण भागात शासनाने झोननिहाय दिलेल्या सूट बाबत सोयगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात संभ्रम निर्माण झाल्याने सोमवारी पहाटेपासून ग्रामीण भागात अचानक वर्दळ वाढली होती.त्यामुळे लॉकडाऊनच्या नियमांचे सोयगाव तालुक्यात उल्लंघन झाले,मात्र दुपारी उशिरा झोन बाबत संभ्रम दूर झाल्यावर परिस्थिती पूर्वपदावर आली होती.
रेड,ऑरेंज,आणि ग्रीन या तीन झोन मध्ये जिल्हानिहाय विभागणी करून तिसऱ्या लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी सोमवारी शासनाने काही प्रमाणात सूट दिली होती,परंतु रेड झोन मध्ये असलेल्या सोयगाव तालुक्याला कोणतीही सूट लागू नसल्याने सोमवारी तालुक्याच्या ग्रामीण भागात नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याने अचानक गर्दी वाढली होती,या गर्दीमुळे कोरोनापासून सुटकारा मिळाला कि काय अशी स्थिती सोयगाव तालुक्यात अकरा वाजे पर्यंत निर्माण झाली होती.परंतु संबंधित ग्राम पंचायतींनी याबाबत पुन्हा जनजागृती करून नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केल्याने मोठा गोंधळ उडाला होता.अखेरीस ग्रामपंचायतींनी मध्यस्थी करून नागरिकांना पुन्हा जनजागृती केल्यावर परिस्थिती पूर्वपदावर आली होती मात्र तालुक्यात सोमवारी सात ते आठ तास लॉकडाऊनचे उल्लंघन झाले होते काही भागात दुकाने सर्रास उघडी करण्यात आली होती.तालुका प्रशासनाने मात्र या नागरिकांच्या वागण्यापुढे हात टेकले होते.

Back to top button