आमदार सुरेश धस यांनी सोमिनाथ कोल्हे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रमांचे केले कौतुक
पाटोदा:गणेश शेवाळे― गेल्या एक दोन महिन्या पासुन कोरोना सारख्या महाभयंकर संकटामुळे संपूर्ण भारत देश परेशान झाला आहे याचा फटका ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकरी मजूर यांना खुप झाला आहे त्यामुळे पाटोदा तालुक्यातील लॉकडॉऊन मुळे आर्थिक अडचणीत आलेल्या गोरगरीब शेतकरी ऊसतोड मजुरांना अडचणीत असल्यामुळे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले सामान्य लोकांच्या मदतीला सुख-दुःखात धावणारे गोरगरीब लोकांच्या दुःखाची जाण असलेले आमदार सुरेश धस यांचे स्वीय सहायक तथा पत्रकार संघाचे अध्यक्ष सोमिनाथ कोल्हे यांनी वाढदिवसावर खर्च न करता सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले होते. कोल्हे यांच्या आवाहनास प्रतिसाद देत दादाश्री हॉटेलचे मालक युवानेते लक्ष्मण सस्ते यांनी मदतीचा हात म्हणून देण्याचे ठरविले आणि त्या अनुषंगाने पाटोदा तालुक्यातील पञकार बांधवाना किराना सामान किट वाटले तर प्रथम नगराध्यक्ष पती बळीराम पोटे यांनी कोरोनटाईन झालेल्या ऊसतोड मजुरांना भाजीपाला किराणा सामानाच्या किटचे वाटप केले तर शहादेव रायते यांनी मजुरांना आर्थिक मदत केली यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेचे दबंग आमदार सुरेश धस यांनी सोमिनाथ कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या वाढदिवसा निमित्त विविध सामाजिक उपक्रम कार्यक्रमाचे कौतुक करून तसेच प्रत्येकाने आपले वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरे करावेत असे आवाहन ही केले. लोकनेते सुरेश धस यांचे विश्वासु म्हणून आष्टी विधानसभा मतदारसंघात कोल्हे यांना ओळखले जातात.आमदार सुरेश धस यांच्या प्रमाणेच सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत आपली वाटचाल व पाऊलावर पाऊल ठेवून मतदारसंघात त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.कोरोना संकटाचे भान लक्षात घेवून इतरत्र खर्च टाळून वाढदिवसा निमित्ताने समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करून सोमवारी वाढदिवस साजरा करण्यात आला कोल्हे परिवार नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते. दरवर्षी असे उपक्रम राबवितात. आज ही वाढदिवसातून कोल्हे परिवार यांनी मोठा सामाजिक बांधिलकीचा संदेश देऊन एक आदर्श निर्माण केला आहे तर पत्रकार बांधवांना किराणा सामानाचे किट वाटल्यामुळे युवानेते लक्ष्मण सस्ते यांचे आभार पत्रकार आमिर शेख यांनी मानले.