औरंगाबाद जिल्हाकोरोना विषाणू - Covid 19सोयगाव तालुका

शेंदुर्णी ता.जामनेरच्या त्या अकरा जणांचे अहवाल निगेटिव्ह ,सोयगावसह पाच गावांनी घेतला सुटकेचा श्वास

सोयगाव,ता.५:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी(ता.जामनेर)येथील त्या ११ जणांचे कोरोना तपासणी अहवाल नकारात्मक असल्याचा अहवाल सोमवारी भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय धुळे यांचेकडून प्राप्त होताच सोयगावसह पाच गावांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
सोयगाव शहरापासून ०७ आणि कंकराळा,जरंडी,माळेगाव,पिंपरी,रावेरी या पाच गावांपासून ०५ कि.मी अंतरावर असलेल्या शेंदुर्णी(ता,जामनेर)येथे नाशिक येथील तपासणीत सकारात्मक आलेल्या जावई रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सासूरवाडीतील ११ जणांना तातडीने जामनेर आरोग्य विभागाने संसात्मक कोरोटाईन केले होते,जामनेर तालुक्यातील मोठी बाजार पेठ आणि बँकिंग कामांसाठी सोयगाव सह पाच गावातील नागरिकांना शेंदुर्निच्या संपर्कात राहावे लागत होते,परंतु या सकारात्मक रुग्णाच्या वृत्ताने सोयगाव शहरासह पाच गावात मोठी खळबळ उडाली होती.शहरापासून ०७ आणि उर्वरित पाच गावांपासून शेंदुर्णी गावाचे अंतर केवळ ५ कि.मी आहे.त्यामुळे सोयगावची धाकधूक वाढली होती,परंतु अखेरीस हे ११ जण कोरोना विषाणूचे नकारात्मक असल्याचा अहवाल सोमवारी धडकल्याने सोयगाव तालुक्यातील पाच गावांनी सुटकेचा श्वास सोडला होता.त्यामुळे अखेरच्या क्षणात या पाच गावांना या अहवालामुळे दिलासा मिळाला आहे.

घबराट दूर-

या पाच गावांपैकी सोयगाव शहराचा शेंदुर्णीशी जवळीकचा संबंध असून त्यापैकी माळेगाव,पिंपरी,जरंडी या तीन गावांपासून शेंदुर्णीसह पाचोरा हे सुद्धा जवळ असल्याने हि तीन गावे पाचोरा आणि शेंदुर्निच्या विळख्यात अडकली होती त्यापैकी शेंदुर्णीचा प्रश्न सुटला असून पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव(हरे)येथील ९ जणांना तपासणी साठी ओलीसांनी उचलले असून पाचोरा येथील कोरोना बधीताच्या अंत्ययात्रेला पिंपळगाव(हरे)येथील या ९ जणांनी हजेरी लावली असल्याची माहिती पाचोरा पोलिसांना मिळाल्यावरून तपासणी साठी घेवून गेले आहे.त्यांचा अहवाल अद्याप हाती आलेला नसल्याने पहिले संकट टळले आहे दुसऱ्या संकटात हि तीन गावे अडकली आह.

Back to top button