अहमदनगर जिल्हाकोरोना विषाणू - Covid 19जामखेड तालुकापाथर्डी तालुकाब्रेकिंग न्युज

#CoronaVirus अहमदनगर: जिल्ह्यातील २३ पैकी २० अहवाल निगेटीव

अहमदनगर, दि.०५:आठवडा विशेष टीम― जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या २३ अहवालापैकी २० अहवाल निगेटीव आले आहेत. आज पुन्हा १३ व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, नेवासा येथील एका कोरोना बाधित रुग्णाचा २१ दिवसानंतरचा पहिला अहवाल निगेटिव आला आहे तर जामखेड येथील ०४ तर संगमनेर येथील ०३ कोरोना बाधित व्यक्तींचा १४ दिवसांनंतरचा पहिला अहवाल निगेटीव आला आहे. आज या व्यक्तींचा दुसरा अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
नेवासा येथील एका कोरोना बाधित रुग्णाचा १४ दिवसानंतरचा पहिला अहवाल निगेटीव तर दुसरा अहवाल पॉझिटीव आला होता. त्यानंतर सात दिवसांनी पुन्हा त्याचा अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. तो अहवाल निगेटीव आला आहे. आता आज त्याचा दुसरा अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आला असून तो निगेटीव आल्यास त्याला डिस्चार्ज मिळेल. तसेच संगमनेर येथील ०३ आणि जामखेड येथील ०४ जणांचा पहिला अहवाल निगेटी आला आहे. त्यांचे घशातील स्त्राव पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयाने आतापर्यत १६२८ व्यक्तींचे स्त्राव तपासणी केली असून त्यापैकी १५३५ जणांचे अहवाल निगेटीव आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४४ असून त्यापैकी २५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दोन व्यक्तींचा दुर्दैवी मुत्यू झाला. सध्या एकूण १७ जण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


Back to top button