बीड:निलेश चाळक―सध्या देशभरात कोरोनो महामारीने थैमान घातले आहे लॉकडाऊन मुळे नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे निवडणूकीच्या वेळेस गावोगावी फिरणार्या नेत्यांना जनतेच्या सुखदुखाची अँलजी तर तर ठराविक कार्यकर्ते गायब झालेचे चिञ दिसून येत आहे
याबाबत अधिक माहीती अशी कि,राज्यभरासह बीड जिल्ह्यातील जनतेवर कोरोनो वायरस मुळे उपासमारीची वेळ आली आहे 22 मार्च पासून लाँकडाऊन सुरू आहे लाँकडाऊन मुळे सर्व क्षेञातील कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे राज्य शासन आणि केंद्र शासन देईल त्या मदतीवर अर्धा घर खर्च ही भागत नसल्याचे बोलले जात आहे निवडणूकीच्या काळात ग्रामीण भागात फिरणारे काही ठरावीक नेते नागरिकांना धाब्यावर फार्महाऊसवर मटणाच्या पंगती देणारे नेते माञ जनता कोरोनो वायरस मुळे दुखात असताना नेते मंडळी माञ जनतेला मदत करताना कुठे ही दिसत नसल्याचे चिञ सध्या बीड जिल्ह्यात दिसत आहे निवडणूकाच्या काळात माञ जनतेला धाब्यावर फार्महाऊस वर पार्ट्या देणारे नेते आता कोरोनो वायरस मुळे जनता दुखात असताना ठराविक नेते माञ जनतेच्या सुख दुखाची अँलर्जी असल्या प्रमाणे ठारविक चारचाकी मध्ये फिरणारा नेता नागरिकांना मदत करताना दिसत नाही तर निवडणूकीच्या काळात नेत्यांचा जयघोष करणारे ठराविक कार्यकर्ते माञ नेतेमंडळीकडून काहीच मदत होत नसल्याने गायब झाले आहेत कि काय असा प्रश्र सध्या जिल्हावासीयातून उपस्थित केला जात आहे
वाढदिवसा दिवशी मैदान चपला सोडायला ही जागा पुरत नाही
एखाद्या मोठ्या नेत्यांचा वाढदिवस असल्यास त्या दिवशी काही नेत्यांकडून ठरावीक कार्यकर्त्यांना व जनतेला खुष करण्यासाठी मोठ मोठ्या पार्ट्या व कार्यक्रम केले जातात माञ त्यावेळस मैदानात चप्पल सोडायला जागा शिल्लक नसते माञ जनेतच्या दुखांत मदत करण्यासाठी कोणताच नेता पुढे येताना दिसत नाही
नेत्यांनी कार्यकर्ते संभाळले तरी अर्धे गाव जगू शकते
निवडणूकीत सोशल मिडीयावर नेत्यांचा जयघोष करणारे कार्यकर्ते ही संध्या कोरोणो वायरसमुळे संकटात असल्याने काही नेत्यांनी
बीड जिल्ह्यात ग्रामीण भागातील निवडणूकीच्या काळातील नेत्याचे जयघोष करणारे कार्यकर्ते जरी संभाळले तरी अर्धा गाव जगू शकतो