परळी तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांची धडाकेबाज कारवाई ; वाळुचे 6 ट्रॅक्टर पकडले, वाळूमाफीयांत खळबळ

परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम―
तहसिलदार डॉ. विपीन पाटील यांनी धाडसी धडाकेबाज कारवाई करत वाळू चोरी उघड करीत तब्बल 6 ट्रॅक्टर पकडले आहेत. लाखो रूपयांचा ऐवज जप्त केला असुन सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान या धडाकेबाज कारवाईने वाळूमाफीयांचे धाबे दणाणले आहेत.

Img 20200506 Wa00105701294389795902656याप्रकरणाची प्राप्त माहिती अशी की, तेलसमुख येथील गंगेच्या पात्रातून वाळू चोरी होत असल्याची माहिती मिळाल्यावरून तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांनी वाळू चोरी पकडण्यासाठी सापळा रचला. दि. 6 मे रोजी रात्री उशिरा त्यांनी बोरखेड कॅनाॅलवर मुक्काम ठोकला. रात्री 2 वाजल्यापासून वाळुचे ट्रॅक्टर येण्यास सुरुवात झाली. एक एक करत तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांनी सकाळपर्यंत तब्बल सहा ट्रॅक्टर पकडले. या ट्रॅक्टरमध्ये लाखो रुपयांची वाळू असुन सर्व जप्त करून सिरसाळा पोलीस ठाण्यात आणले आहे. पोलीसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाडसी कारवाई करण्यात आली असून तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांच्यासोबत नायब तहसीलदार बाबुराव रुपनर, तलाठी युवराज सोळंके, कोतवाल खाजा आदी उपस्थित होते.
दरम्यान वाळू माफीयांवर एवढी मोठी कारवाई झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले असून परिसरात खळबळ उडाली आहे. धाडसी कारवाईबद्दल तहसीलदार डॉ. विपीन पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button