सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― आमखेडा शिवार येथे सोयगाव पोलीसांनी धाड टाकून ६ (सहा) जुगा-यांना मुद्देमालासह अटक केली.सोमवार दि.४ रोजी आमखेडा शेती शिवार येथे एका शेतातात पैसे लावून झन्नामन्न(पत्ता) खेळ खेळत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली.यावरून सोमवारी सायंकाळी सहा.पोलीस निरीक्षक सुदाम सिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सोयगाव बीट जमादार संतोष पाईकराव, दिलीप तडवी, रविंद्र तायडे,विनोद कोळी,मंगलसिग लोदंवाल,संदिप चव्हाण, सागर गायकवाड आदी या ठिकाणी धाड टाकून एकूण ६ (सहा) यांना अटक केली. त्याच्या ताब्यातून रोख रक्कम ६३४० रूपये व जुगाराचे साहित्य जप्त केले.सहा ही आरोपी विरूध्द साथरोग प्रतिबंध कायदा,संचारबंदी उल्लंघन आदीसह विविध कलमाखाली गुन्हे नोंदविण्यात आले आहे असे सोयगाव पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक सुदाम सिरसाठ यांनी सांगितले