पाटोदा:गणेश शेवाळे― पाटोदा शहरातील सर्व दुकाने उद्योग लॉकडाऊनमुळे बंद आहेत यामुळे अनेक व्यापाऱ्याना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे तसेच शिवणकाम करून उपजीविका करत असलेल्या महिलाना लॉकडाऊनच्या काळात उपासमारीची वेळ आली असती माञ शिवणकाम करणाऱ्या महिलांना आर्थिक अडचणींचा सामना होई नय म्हणून आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून पाटोदा नगरपंचायतचे सभापती बालाजी जाधव यांनी शिवणकाम करणाऱ्या महिलांना घरबसल्या कापडी मास्क बनवण्याचे काम दिल्याने एक महिला दिवसाला तिनशे ते चारशे कापडी मास्क शिवत आहेत त्यातून त्यांना दिवसाला पाचशे ते हजार रुपये आर्थिक उत्पन्न मिळत आहे शिवाय अत्यंत गरीब कुटुंबांना किराना सामान किट ही मोफत दिल्याने शिवणकाम करणाऱ्या महिलांनची आर्थिक अडचण दूर झाल्याने पाटोदा नगरपंचायतचे अभ्यासू सभापती बालाजी जाधव यांच्या प्रयत्नामुळे शहरातील शेकडो महिलांना लॉकडाऊनच्या काळातही रोजगार मिळाला आहे.