सोयगांव,दि.६:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगांव शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेचा व्यापार , आरोग्य व बँकिंग व्यवहार जळगाव जिल्ह्यातील विविध शहरात आहे परंतु कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सध्या जिल्ह्याच्या सिमा बंद करण्यात आलेल्या आहेत. बँक,आरोग्यासारख्या अत्यावश्यक सेवांसाठी देखील पोलीस जाऊ देत नसल्यामुळे सोयगाव तालुक्यातील नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे.
सोयगांव तालुका हा औरंगाबाद जिल्ह्यातील म्हणजेच मराठवाड्यातील शेवटचा तालुका खानदेश मराठवाडा सीमेवर वसलेल्या तालुक्यातील जनता केवळ शासकीय कामांनाच जिल्ह्याच्या ठिकाणी येतात.औरंगाबाद १२० की मी आणि जळगाव ६० की.मी असल्यामुळे सोयगांव तालुक्यातील नागरिकांना जळगाव आपलेसे वाटते.जळगाव जिल्ह्यातील पाचोरा , शेन्दुर्नि , पिंपळगांव हरे , जामनेर , नगरदेवळा ही मोठी बाजारपेठ असलेले शहर सोयगांव तालुक्यापासून वीस ते पंचवीस की मी अंतरावर असल्यामुळे शिक्षण , बाजारपेठ , आरोग्य तसेच शेती संबधी व्यापार तसेच बँकिंग व्यवहारासाठी नागरिकांचा या गावांसाठी दररोजचा सबंध येतो.कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून जिल्हा बंदी करण्यात आली आहे.याचा फटका सोयगांव तालुक्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे.
सोयगावांत सोनोग्राफी एक्सरेची सुविधा नाही
सोयगांव हे तालुक्याचे ठिकाण असले तरी इतर तालुक्यांप्रमाणे सोयगाव फार मोठे शहर नाही ते एका मोठे गावच आहे.येथे सोनोग्राफी एक्सरे ची सुविधा नाही त्यासाठी पाचोरा किंवा जामनेर ला जावं लागतं या छोट्याशा उपचारासाठी सरकारी दवाखान्यातून रेफर पत्र मिळत नाही शिवाय रुग्णवाहिका देखील घेऊन जाणं शक्य नाही अशा रुग्णांना तरी शेन्दुर्नि पार करू द्यावी अशी मागणी होत आहे.