पाटोदा:आठवडा विशेष टीम― पाटोदा येथे भगवान गौतम बुद्ध यांची 2564 वी जयंती मोठ्या थाटात माटात आप आपल्या घरीच साजरी करण्यात आली आहे. भारतीय बुद्ध महासभेचे संजय जावळे यांच्या घरी प्रथम भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन दिक्षंत जावळे यांच्या हस्ते करण्यात येऊन पंचशिल त्रिशरण घेऊन खिरदान करण्यात आले. तसेच आयु.भगवान जावळे यांच्या घरी रमेश जावळे यांच्या हस्ते पूजन करून सर्व बौद्ध बांधवांनी आपल्या घरी जयंती साजरी करावी असे आवाहन केले. धम्मानंद जावळे यांनी पण भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून वंदना घेतली.