अणदुर:आठवडा विशेष टीम―
पोलीस महासंचालक मानचिन्ह व पदक मिळाल्या बद्दल आणि उत्कृष्टपणे सेवा बजावल्याबद्दल नळदुर्ग पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक कैलास लहाने यांचा तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे मंगळवार दि. ५ मे रोजी घुगे परिवार च्या वतीने सत्कार करण्यात आला.
पोलीस दलात सतत एक वेगळी छाप पाडणारे चर्चेतील नाव म्हणजे पोलीस उपनिरीक्षक कैलास लहाने. अणदुर येथे पोलीस उपनिरीक्षक कैलास लहाने साहेब यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र मिळाल्याबद्दल त्यांचा अणदुर येथे घुगे परिवारच्या वतीने यशोचित सत्कार करण्यात आला. त्याचा हार फेटा, शाल, गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सैनिक दत्तात्रय घुगे , माजी सैनिक अनिल घुगे , अक्षय घुगे , ज्ञानेश्वर घुगे , कमलाकर घुगे , प्रकाश घुगे , आण्णासाहेब घुगे उपस्थित होते. यांच्या यशाबद्दल लहाने यांचे अणदुर, नळदुर्ग तसेच उस्मानाबाद जिल्हात कौतुक होतं आहे.