कोरोना विषाणू - Covid 19जळगाव जिल्हाब्रेकिंग न्युज

जळगाव जिल्ह्यात आणखी आज ५ कोरोना बाधित रूग्ण आढळले , कोरोना बाधित रूग्णांची संख्या ९० झाली

जळगाव दि.०७:आठवडा विशेष टीम― जिल्ह्यातील स्वॅब घेतलेल्या 46 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 41 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून पाच व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भुसावळ येथील एक 60 वर्षीय पुरूष, कांचननगर, जळगाव येथील 35 वर्षीय महिला, तर पाचोरा येथील 44 व 53 वर्षीय पुरूष व 20 वर्षीय महिला अशा तीन व्यक्तींचा समावेश आहे.

निगेटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये पाचोरा येथील 19 व्यक्तींचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 90 इतकी झाली असून त्यापैकी चौदा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.


Back to top button