शासनाकडे ग्रामस्थांच्या आरोग्याचे रक्षण करण्याची मागणी
ग्रामस्थांची धनंजयजी मुंडे यांच्याकडे लेखी तक्रार ,कारवाईची मागणी :- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
लिंबागणेश दि.०७:आठवडा विशेष टीम―लिंबागणेश येथिल जलशुद्धीकरण प्रकल्प अपुर्ण असून त्यामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार उपसरपंच शंकर वाणी व ग्रामविकास अधिकारी तेलप यांनी केला असुन जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर ग्रामपंचायत कर्मचारी मार्फत गावात जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण होऊन शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा होत असल्याची दवंडी दिली जाते, मात्र जलशुद्धीकरण प्रकल्प अपुर्ण असून भायाळा साठवण तलावावरुन गावातील टाकीला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी दोन ठिकाणी वायभट वस्ति ,पोखरी रोड आणि डॉ.सुदर्शन वाणी यांचे आई हांस्पिटल, समोर आठवडाभरापासून फुटल्यामुळे दुषित पाणी जलवाहिनीत जात असल्यामुळे आणि तेच पाणी ग्रामस्थांना जलशुद्धीकरण प्रकल्पातील असल्याचे दवंडी द्वारा ग्रामस्थांकडुन पिण्याचे पाणी म्हणून त्याचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर दुषित पाणी पिण्यामुळे साथीचे आजार हगवण , उलटी , काविळ ,टाईफाईड तसेच त्वचेचे विकार व सर्दी,खोकला, घसा खवखवणे आदी लक्षणे दिसु शकतात त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होऊ शकते आणि ग्रामस्थांना आजारांसाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागु शकतो त्यामुळे शासनाने तात्काळ उपाययोजना करून ग्रामस्थांच्या आरोग्याचे रक्षण करावे यासाठी मा.राहुलजी लेखावार , जिल्हाधिकारी , मा.अजितजी कुंभार , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड , मा. डॉ.राधाकिसन पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी बीड, मार्फत मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, ग्रामविकास मंत्री, मा.धनंजयजी मुंडे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना डॉ.गणेश ढवळे, डॉ.सुदर्शन वाणी ,कल्याण वाणी , ग्रां.पं.स. श्रीहरी निर्मळ, सुरेश ढवळे, विलास जाधव, आरुण ढवळे, विक्रांत वाणी, अशोक वाणी, मयुर वाणी, अमोल जाधव, अभिजित गायकवाड यांनी लेखी तक्रार ई-मेल व्दारे पाठवली आहे.