सोयगाव,दि.७:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
कोविड-१९ च्या लॉकडाऊनमध्ये अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना रेशनमध्ये साखर मिळणार असल्याने या लाभार्थ्यांचा लॉकडाऊन गोड होणार आहे.त्यासाठी ८० क्विंटल साखर प्राप्त झाली असल्याची माहिती तहसीलदार प्रवीण पांडे यांनी दिली.
सोयगाव तालुक्यात लॉकडाऊनच्या काळात तहसीलच्या पुरवठा विभागाकडून पहिल्या महिन्यात अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब या लाभार्थ्यांना ४४७ मेट्रिक टन मोफत तांदूळ वितरण करण्यात आला आहे.सामाजिक अंतर पाळून सोयगाव तालुक्यात मोफत धान्य वितरणासह नियमित धान्याचीही शंभर टक्के वाटप झाले असल्याचे पूर्वतः विभागाकडून सांगण्यात आले.त्यानंतर मात्र दुसर्या महिन्याचा मोफत तांदूळ तहसील कार्यालयाला प्राप्त झालेला असून आगामी दोन दिवसात १९२८२ शिधापत्रिकाधारक ८८२४६ सदस्य संख्या असलेल्या लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहे.परंतु त्याआधी प्रती वीस रु किलो याप्रमाणे अंत्योदय योजनेतील २७११ कार्डधारकांना साखर वितरीत करण्यात येणार आहे.त्यामुळे या योजनेतील शिधापत्रिकाधारकांचा लॉकडाऊन मात्र गोड होणार आहे.