मुंबई : “आमचे पक्षाध्यक्ष शरद पवार लोकसभा निवडणूक लढवणार की नाही, याबाबत दोन दिवसांत ते स्वतःच निर्णय घोषित करतील. मात्र, त्यांनी निवडणूक लढवली तर, कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा संदेश जाईल. भाजपा-शिवसेनेचा पराभव करण्यासाठी पवारसाहेब प्रयत्न करत आहेत. त्याला आणखी ताकद मिळेल” अशी आमची भूमिका आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्षाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत सांगितले. येथील पक्षकार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते.
लोकसभा निवडणुकीसाठी कशी रणनीती आखायची, यासाठी एक बैठक उद्या शरद पवार घेतील, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. नगरच्या जागेबाबत निर्णय झालेला नाही. मात्र काही दिवसांतच महाआघाडीला अंतिम स्वरूप मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.