ऊसतोड कामगारपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

ऊसतोड मजुरांना तात्काळ किराणा किटचे वाटप करावे

बीड:आठवडा विशेष टीम―
बीड जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून दिला जाणारा किराणा मला क्वारंटाईन असलेल्या ऊसतोड मजुरांना ग्रामपंचायतने लवकर वाटप करणे आवश्यक आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ऊसतोडणी करून जिल्ह्यात परतलेल्या मजुरांसाठी महत्वपूर्ण व दिलासादायक निर्णय घेतला होता त्यामधातून जिल्हा परिषदेच्या स्वनिधी मधून जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांना २८ दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीसाठी म्हणून जीवनावश्यक किराणा साहित्य मोफत वाटप करण्यात येणार होते. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वनिधी मधून प्राथमिक स्वरूपात १ कोटी ४३ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, ग्रामविकास विभागाने यास विशेष बाब म्हणून तांत्रिक मान्यता होती.
ऊसतोडणीसाठी गेलेल्या ऊसतोड मजुरांना राज्य शासनाने धनंजय मुंडे यांच्या सातत्यपूर्ण यशस्वी पाठपुराव्याने आपापल्या गावी परतण्यासाठी परवानगी दिली. त्यांना आपल्या गावी सुरक्षा व खबरदारीचा उपाय म्हणून २८ दिवसांसाठी अलगिकरणात ठेवण्यात आले आहे. अशावेळी त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची परवड होऊन जीवनावश्यक वस्तूंसाठी हाल होऊ नयेत या उद्देशाने ना. मुंडेंनी हा निर्णय घेण्याबाबत जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना निर्देशीत केले होते . तसेच कोणत्याही गावामध्ये किराणा किट वाटप करण्यावरून राजकारण होऊ नये किंवा अन्य अडचणी येऊ नयेत यासाठी दर चार गावांमध्ये एक विस्तार अधिकारी दर्जाचा क्षेत्रीय अधिकारी नेमून त्यांच्या नियंत्रणाखाली हे वाटप घरपोच करावे अशा सूचना ना.मुंडेंनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधितांना दिल्या होत्या.
आजपर्यत ६०% ग्रामपंचायतच्या बँक खात्यात निधी वर्ग झाला असून अद्याप राहिलेल्या ग्रामपंचायला आज सायंकाळपर्यत सर्व निधी वर्ग होणार आहे, व त्या निधीमधून प्रति कुटुंब ६५०रु याप्रमाणे चांगल्या दर्जाचा किराणा खरेदी करावा त्यामध्ये कोलम तांदूळ ५ किलो,साखर,सोयाबीन तेल, तूर दाळ,मीठ प्रति १ किलो प्रमाणे व मिरची पावडर, कांदा लसुण २०० ग्राम प्रमाणे व हळद पावडर जिरे मोहरी १०० ग्राम प्रमाणे व कपडा व अंगांची साबण इत्यादी किराणा माल मजुरांपर्यत पोहच करायचा आहे.
गावामध्ये हे किराणा किट देताना नियमांचे पालन करून सनियंत्रण अधिकारी, सरपंच, उपसरपंच,गावातील दोन नागरिक, पोलीस पाटील किंवा सरकारी अधिकारी व ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत हे किराणा किट मजुरांपर्यत तातडीने पोहच करावे असे प्रशासनाचे आदेश आहेत,या नियमांचे उल्लंघन केल्यास व माल खरेदी करताना कमीपणा व टाळाटाळ केल्यास आपल्यावर शासकीय कार्यवाही होऊ शकते.

“जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार किटचे वाटप व्हावे व गावात सरपंचांनी भेदभाव न करता मजुरांना किराणा किटचे तात्काळ वाटप करणे गरजेचे आहे.”

―इंजि.दत्ता हुले
(ऊसतोड मजुर पुत्र पाटोदा)

Back to top button