कार्यक्रमपाटोदा तालुका

पांडुरंग नागरगोजे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मान्यवरांकडून अभिष्टचिंतन

पाटोदा पंचायत समिती पदाधिकारी व अधिकारी कर्मचाऱ्यांनी केले स्वागत

आठवडा विशेष|प्रतिनिधी

पाटोदा दि.०२ : अखिल भारतीय सरपंच परिषदेचे बीड जिल्हाअध्यक्ष तथा रोहयो ता.अध्यक्ष सरपंच पांडुरंग नागरगोजे यांचा वाढदिवस पाटोदा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. तर पंचायत समिती सभापती, पदाधिकारी, व अधिकारी कर्मचारी यांनी त्यांचे अभिष्टचिंतन करून साजरा केला.
पाटोदा तालुक्यात राजकीय व सामाजिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत गावची ग्रामपंचायत जिंकून भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याचे पाईक राहिलेले नागरगोजे यांना पक्ष नेत्रत्वाने रोहयो ता. अध्यक्षपद देऊन पुढे अखिल भारतीय सरपंच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष केले, आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त पाटोदा तालुक्यात विविध समाज कल्याण उपयोगी उपक्रम राबविताना शालेय विद्यार्थी, व समाजातील उपेक्षितांना विविध प्रकारच्या साहित्याचे वितरण करण्यात आले. नागरगोजे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील पंचायत समिती सभागृहात त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभापती बबन सोनवणे, प.स. सदस्य महेंद्र नागरगोजे,देविदास शेंडगे, काकासाहेब लांबरुड, गटविकासअधिकारी राजेंद्र मोराळे, विस्तार अधिकारी जाधव व सर्व कर्मचारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.