बीड जिल्हाब्रेकिंग न्युजहेल्थ

बीड: नवीन क्षयरोग निदान झालेले रुग्णांची माहिती आरोग्य विभागास देणे बंधनकारक

निक्शय ॲप द्वारे ऑनलाइन माहिती सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

बीड, दि.८:आठवडा विशेष टीम― कोविड – १९ या साथरोगाचा प्रादुर्भाव टाळणे व परिणामी होणारे मृत्यू टाळणे आवश्यक आहे. तसेच जिल्ह्यातील नवीन क्षयरोग निदान झालेले रुग्णांची माहिती सर्वं खाजगी वैद्यकीय व्यवसायिक , खाजगी औषधे विक्रेते व खाजगी प्रयोगशाळा चालकांनी देणे बंधनकारक आहे त्याकरिता राज्य शासनाने निकश्य अॅप विकसित केलेले आहे या निक्शय ॲप द्वारे ऑनलाइन माहिती सादर करावी असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

1) खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांनी (टीबी नोटिफिकेशन) क्षयरुग्णांची माहिती
2) खाजगी औषध विक्रेते यांनी शेड्युल एच 1अँटी टी बी ड्रग क्षयरोग प्रतिबंध औषधी विक्री केलेल्या रुग्ण संबंधितची माहिती
3) नोंदणीकृत प्रयोग शाळा चालकांनी नवीन निदान झालेल्या क्षयरुग्णची माहिती आरोग्य यंत्रणेस कळविणे बंधनकारक आहे.
4)माहिती न देणाऱ्या खाजगी वैद्यकीय व्यावसायिक, खाजगी औषधी विक्रेते, खाजगी प्रयोग शाळा चालक यांचे विरुद्ध भारतीय दंड संहिता(1860 का 45) चे कलम 269 व 270 च्या नुसार खलील दंडात्मक कार्यवाहीची तरतूद करण्यात आली आहे.
तसेच सर्वं खाजगी वैद्यकीय व्यवसायिक , खाजगी औषधे विक्रेते व खाजगी प्रयोगशाळा चालकाने नवीन क्षयरूग्णची माहिती, क्षय रोगाच्या निवडण्यासाठी आरोग्य विभागास, त्वरित देण्याची आहे. आपल्याकडे निदान आपल्याकडे झालेल्या क्षयरूग्णची माहिती त्वरीत व नियमितपणे आरोग्य यंत्रणेस द्यावी. अन्यथा आपणावर कायदेशीर कार्यवाही केली जाईल याची नोंद घ्यावी. नवीन क्षयरुग्णाची माहिती निकश्य अँप द्वारे लगेच भरण्यात यावी.
सोबत माहिती पुस्तिका जोडली आहे तसेच जिल्हायातील खाजगी क्षेत्रातील वैद्यकीय व्यावसायिक , औषध विक्रते व प्रयोगशाळा यांचे ऑन लाईन निकश्य प्रणाली मध्ये रजिस्ट्रेशन नसेल तर त्यांनी खालील क्षयरोग कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून आपली माहिती देणे बंधनकारक आहे.

(1)श्री सुरवसे एम. एल. ता.बीड जिल्हा पीपीएम समन्वयक 9822654688
(2) श्री पठाण एस. के. ता.बीड टीबी हेल्थ व्हिजीटर 9226353025
(3) श्री.पालीमकर एन. एम. ता.बीड टीबी हेल्थ व्हिजीटर 9552465990
(4) श्री चव्हाण एम.के.ता. परळी वैद्यनाथ टीबी हेल्थ व्हिजीटर 8766866526
(5) श्री. बर्दापूरकर एस.एस. ता. परळी वैद्यनाथ टीबी हेल्थ व्हिजीटर 9422325996
(6) श्रीमती शिंदे वाय बी तालुका गेवराई टीबी हेल्थ व्हिजिटर 8600508900
(7) श्री सुरवसे एस. ए. तालुका-अंबाजोगाई टी बी हेल्थ व्हिजिटर 9422988894
(8) श्री. खडके एल. एम. तालुका अंबाजोगाई टीबी हेल्थ व्हिजिटर 7385233600
(9) श्री राठोड व्हि .बी.ता.शिरूर कासार एस टी एस 9049899056
(10) श्री पवणे बी.एस.ता.पाटोदा एसटीएस 9420019216
(11) श्रीमती बनसोडे एच.ए.म तालुका वडवणी एसटीएस 9881003361
(12) श्री चाटे आर .यु .तालुका धारूर व माजलगाव एसटीएस 9923124311
(13) श्री जडे एस. एस. तालुका केज एसटीएस 9881294199
(14) श्री भोसले आर. एस. ता.आष्टी एसटीएस 9404301255.
तरी वरील सर्व संबंधितानी ही माहिती कळविल्यास ५०० रुपये बक्षिस देण्याची देखील तरतूद असून व रुग्णावर पूर्ण उपचार करुन त्याची माहिती दिल्यास पून्हा १००० रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जातो यामुळे माहिती द्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी केले आहे.


Back to top button