कोरोना विषाणू - Covid 19पाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

पाटोदा नगरपंचायतने फवारणीची चमकोगिरी थांबून गोरगरिबांना खाण्याची तर मजुरांना कामाची सोय करावी – उमर चाऊस

पाटोदा:गणेश शेवाळे― कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून केलेल्या लॉक डाऊनला एक दीड मिहिने होत आले यामुळे गोरगरीब, हातावर पोट असलेल्या मजुराचे जीवन अतिशय हलाखीचे झाले आहे .सामाजिक कार्यकर्त्यांनी वाटलेले मोफत सामान ही गोरगरिबांच्या घरातील संपले असल्याने सामान्य लोक परिशान झाले आहेत.

जीवन जगण्यासाठी काही तरी काम करावे वाटते पण हाताला काम नाही.यामुळे गोरगरीब व मजूर लोक अतिषय हलाखीचे जीवन जगत असताना पाटोदा नगरपंचायत मात्र अग्निशामक दलाच्या गाडीने फवारणी करून जणूकाय आमच्या याकामामुळेच पाटोदा शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाटोदा शहरात झालाच नाही असे दाखवत असून निवडणूका डोळ्यासमोर धरून चमकोगिरी करत आहेत. व हातावर पोट असलेले मजूर, गोरगरीब सामान्य जनतेला हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली असल्यामुळे पाटोदा नगरपंचायतने गोरगरिबांची खायची व मजुरांच्या हाताला कामाची सोय करण्याचे सोडून सारखी सारखी फवारणी करून पाण्याचा अपव्यय करून निवडणुका डोळ्या समोर धरून पाटोदा नगरपंचायत चमकोगिरी करत आहे.अशी टीका काँग्रेस नेते उमर चाऊस यांनी केली आहे.

Back to top button