#Evacuation परदेशात असलेले भारतीय नागरीकांना मायदेशी आणणेकामी केंद्र सरकारची आदर्श कार्यपद्धती (SOP) जारी

श्रीकांत गायकवाड यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती―जिल्हाधिकारी राहुल रेखावार

बीड दि.८:आठवडा विशेष टीम― नोकरी , शिक्षण ,आंतरवासीयता , पर्यटन व व्यवसाय इ . निमित्त परदेशात असलेले भारतीय नागरीक COVID - 19 च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने मायदेशी परतू इच्छित आहे. अशा नागरीकांना मायदेशी परत आणणेकामी केंद्रीय गृह मंत्रालयामार्फत आदर्श कार्यपद्धती ( SOP ) जारी करण्यात आलेली आहे. परदेशात अडकलेल्या बीड जिल्ह्यातील नागरीकांशी समन्वय साधून आदर्श कार्य पद्धतीप्रमाणे ( SOP ) कार्यवाहीसाठी श्रीकांत गायकवाड यांना नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहेत असे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

नोडल अधिकारी यांचे नाव पदनाम नेमून दिलेले कामकाज पुढील प्रमाणे आहे- श्रीकांत गायकवाड, उप जिल्हाधिकारी, रोहयो, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड मो . क्र . 9420643015
नोडल अधिकारी हे जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली व जिल्हा पोलीस अधिक्षक यांचेशी समन्वय साधून नोकरी, शिक्षण , आंतरवासीयता, पर्यटन व व्यवसाय इ . निमित्त परदेशात असलेल्या बीड जिल्ह्यातील नागरीकांशी समन्वय साधून आदर्श कार्यपद्धती प्रमाणे कार्यवाही करणार आहेत.
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा ( कोव्हीड - 19 ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग अधिनियम 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2 , 3 , 4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे .साथ रोग अधिनियम 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व
नियमावली मधील तरतुदीनुसार व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 30 अन्वये खालील प्रमाणे नमुद कामकाज करण्यासाठी अधिकारी सदर नेमणूक करण्यात आली आहे .
या आदेशाचे आवज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने भारतीय दंडसंहिता 1860 ( 45 ) याच्या कलम 188 शिक्षेसपात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल आणि दिवाणी व फौजदारी कार्यवाही करण्यात येईल.

Previous post अहमदनगर: संगमनेर येथील एक आणि धांदरफळ येथील 4 जणांना कोरोनाची लागण ; जिल्ह्यात कोरोना बाधिताची संख्या आता 49
Next post पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब ऊसतोड मजुरांचे पालक होऊन कधी मुजोर तलाठी आणि ग्रामसेवकांना वठणीवर आणणार ? – डॉ गणेश ढवळे