पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना सरपंच, ग्रामसेवक,तलाठी यांचे आव्हान ,ऊसतोड मजुरांना पालकमंत्री ,जिल्हाधिकारी बीड यांनी घोषणा केली त्यांच्याकडूनच मोफत किराणा किट घ्या, ऊसतोड मजुरांची संवेदनशील पत्रकारांना विनंती आमची व्यथा पालकमंत्री, जिल्हाधिकऱ्यांपर्यंत पोहचवा ―डॉ.गणेश ढवळे
मांजरसुंबा:आठवडा विशेष टीम― बीड तालुक्यातील मौजे ससेवाडी येथिल सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांचा मुजोरपणा जिल्हाधिकारी यांना तक्रार करा नाहीतर पंचायत समितीला तक्रार करा.
२० दिवसांपासून होम क्वारंटाईन ऊसतोड मजुरांची हेळसांड येथे होत आहे.संवेदनशील पत्रकारांनी जिल्हाधिकारी यांना आमची व्यथा कळवुन आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी ऊसतोड कामगार करत आहेत.
गहीनीनाथ भानुदास सावंत ,ऊसतोड मजूर
कलेक्टर आणि पंचायत समितीला जाऊन भांडा.
“२० दिवस झाले आम्ही इथंच आहोत,
खायला काही नाही, सरपंच, ग्रामसेवक यांना विचारले तर कलेक्टर, पंचायत समितीला जाऊन भांड म्हणतेत”
सारिका सोमीनाथ सावंत , ऊसतोड मजूर
आम्हाला रानात उपाशी ठीवलंय, लेकरं बाळं रडतेत , सरपंच व ग्रामसेवक २० दिवस झाले आलेच नाहीत, फोनवर म्हणतेत आमच्याकडं काही नाही. ग्रामसेवकांनी पाण्याची,लाईटीची कशाचीच सोय केली नाही. मांजरसुंभा येथिल माजी सरपंच आरुणकाका रसाळ यांनी एकदा जेवण दिले आणि रोज पिण्याचे पाणी टँकर पाठवून देतात.
डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते बीड–
ऊसतोड मजुरांना कसलीही सुविधा उपलब्ध करून देत नाहीत, २० दिवस झाले सरपंच,ग्रामसेवक, तलाठी त्यांची प्रत्यक्ष भेट घेत नसतील व फोनवरून बोलून त्यांना गावाच्या बाहेर रहा एवढंच म्हणतात. पालकमंत्री मुंडे साहेब यांनी केलेल्या मोफत किराणा किट विषयी विचारले तर त्यांनाच जाऊन विचारा,कलेक्टर आणि पंचायत समितीला जाऊन भांडा अशी भाषा वापरली जाते. यांना जिल्हाधिकारी, पालकमंत्री मुंडे साहेब बीड, यांनी कठोरात कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.याविषयी जिल्हाधिकारी बीड मार्फत मुख्यमंत्री, अन्न पुरवठा मंत्री, ग्रामविकास मंत्री, कृषिमंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड धनंजयजी मुंडे साहेब यांना लेखी तक्रार ई-मेल व्दारे पाठवली आहे.