लोकप्रतिनिधी नसताना शासन आणि जनता यामधील दुवा म्हणून रुपेशराजे बेद्रेपाटील काम करत आहेत
पाटोदा:गणेश शेवाळे― कोरोणा विषाणूने गेल्या दोन महिन्यापासून जग,देश, व राज्यभर थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर जनतेच्या काळजीचा भाग म्हणून केंद्र व राज्य सरकारने सर्वत्र लाँकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, कित्येक दिवसानंतर ही परिस्थिती निवळत नसल्याने विविध जिल्ह्यात व राज्याबाहेर सुद्धा मराठवाड्यातील अनेक तरुण अडकून पडलेले आहेत.या मराठवाड्यातील लोकांना देशातील आंध्रप्रदेश, तामिळनाडू, गुजरात , दिल्ली सह विविध राज्यातून महाराष्ट्रात व मराठवाड्यात आणण्यासाठी ‘मराठवाडा रहिवासी संघ’ आपल्या पूर्ण ताकदीनिशी परिश्रम घेत असून राज्य व देशपातळीवरील नेत्यांशी संपर्कात राहत त्यांना आपल्या मायभूमीत आणण्यासाठी पाठपुरावा करीत आहे मराठवाडा रहिवाशी संघाचे संस्थापक रुपेशराजे बेद्रेपाटील स्वतः गेल्या कित्येक दिवसापासून मराठवाड्यातील भूमिपुत्रांना सहकार्य करत तसेच पुणे येथील युवकांना अन्नधान्यही दिले आहे. तर राज्याबाहेर कित्येक दिवसांपासून अडकून पडलेल्या मराठवाड्यातील युवक आणि व्यक्तींना येथे आणण्यासाठी नुकताच संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून संपर्क साधत त्या त्या राज्यातील प्रशासनाशी संवाद साधत असल्याचे समजते.दरम्यान, लोकप्रतिनिधी नसतानाही शासन आणि जनता यामधील दुवा म्हणून रुपेशराजे बेद्रेपाटील काम करत आहेत. मराठवाड्यातील लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी व त्यांच्या भल्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या या संघाने लाँकडावून काळात पुणे, मुंबई व राज्याबाहेर ही असलेल्या या भूमिपुत्रांना येण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ‘मराठवाडा रहिवाशी संघा’ चे अध्यक्ष रुपेशराजे बेद्रेपाटील यांनी सांगितले.