जनतेसाठी आईच्या निधनाचे डोंगरा एवढे मोठे दु:ख विसरून पोलिस निरीक्षक सिद्धार्थ माने पाटोदा तालुक्याच्या सुरक्षिततेसाठी लागले कामाला

पाटोदा:गणेश शेवाळे― जेव्हा आपल्या जवळची व्यक्तीचे निधन होते, तेव्हा त्यामधून मानसिकरीत्या बाहेर पडणे खूप अवघड असते. पण आईच्या निधनानंतर काही दिवसात दुःखातून सावरून कोरोना सारख्या महाभयंकर आजार पसरू नये सरकारने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पणे जनतेने पालन करावे यासाठी आपण जिथे पोलिस खात्याच्या माध्यमातून सेवा करतोत त्या भागात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये तसेच पाटोदा तालुक्यात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून आईच्या निधनाच्या डोंगरा एवढ्या मोठ्या दुःखातून सावरून पाटोदा पोलिस स्टेशनचे दबंग पोलिस निरीक्षक सिद्धार्थ माने कामावर रुजू होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडू नये तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पाटोदा तालुक्यात आपल्या सर्व कर्मचार्‍यांना सोबत घेऊन चांगल्या उपाययोजना करत आहेत. स्वतः रस्त्यावर उभा राहून गर्दी होऊनय म्हणून प्रयत्न करतात. लोकांना गोडीत सांगता सांगता काही अतिशहाने ऐकत नसेलतर त्यांना काठीचा प्रसाद देऊन वटणीवर आणतात यामुळे आतापर्यंत पाटोदा तालुक्यात लॉकडॉऊनच्या काळात कसल्याही प्रकारचा अनर्थ घडला नाही. दबंग पीआय माने यांच्या दमदार कामगिरी मुळे पाटोदा तालुका एकदम शांत असून आईच्या निधनाच्या दुःखातून स्वतःला सावरून आपल्या जिवाची पर्वा न करता पाटोदा तालुक्याच्या सुरक्षेसाठी व आपल्या सहकार्‍यांना अडचणी येऊ नयेत म्हणून अहोरात्र झटणाऱ्या पीआय सिद्धार्थ माने यांच्या दबंग कामगिरीला पाटोदा तालुक्यातील प्रत्येक सामान्य नागरिक सल्युट करीत आहेत.


Previous post ‘वाघांनो रडू नका’ पंकजाताई मुंडेंनी कार्यकर्त्यांना केलं भावनिक ट्वीट
Next post संवेदनशील पत्रकारांच्या दणक्याने प्रशासनाला जाग आली ,अखेर ससेवाडी येथिल ऊसतोड मजुरांना किराणा किट वाटप करण्यात आले―डॉ.गणेश ढवळे