मांजरसुंबा दि.०९:आठवडा विशेष टीम― बीड तालुक्यातील मौजे ससेवाडी येथिल ऊसतोड मजुरांची हेळसांड सरपंच , ग्रामसेवक,तलाठी करत होते. २० दिवसांपासून त्यांना भेटायला आले नव्हते. फक्त फोनवरून गावाबाहेर रहायचे गावात यायचे नाही असा इशारा द्यायचे.
ईतर कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही. ऊसतोड मजुरांनी मोफत किराणा किट वाटप करण्याविषयी विचारले असता ज्यांनी घोषणा केली त्या पालकमंत्री, जिल्हाधिकारी, तहसिलदार, पंचायत समितीला जाऊन भांडा म्हणायचे. परवा त्यांची लेखी तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली होती त्यांनी बीड जिल्ह्यातील पत्रकारांना विनंती केली होती.
त्यानंतर न्युज सेव्हन डेज न्युज पोर्टल चॅनेल वर बातमी प्रसिद्ध झाली होती तसेच मा.ऋषिकेश विघ्ने संपादक आठवडा विशेष आणि शेख अजिज यांच्या जय हिंद महाराष्ट्र या न्युज मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर आज दि. ०९/०५/२०२० शनिवार रोजी सकाळी ११ वा.१५ मिनिटे मोफत किराणा किट वाटप करण्यात आले.
यावेळी २० दिवस कधीही भेटायला न येणारे सरपंच,ग्रामसेवक ,तलाठी हे त्रिकुट हजर होते.
ऊसतोड मजुरांनी सर्व संवेदनशील पत्रकारांचे आभार मानले आहेत.