अंबाजोगाई: कृषि महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्यपदी डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांची नियुक्ती

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― येथील कृषि महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्यपदी डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी नुकताच पदभार स्विकारला आहे.

डॉ.बाबासाहेब ठोंबरे हे यापूर्वी लातूर येथील कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य होते. त्यापूर्वी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ,परभणी येथे पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे प्रमुख होते.डॉ.ठोंबरे हे केज
तालुक्यातील उंदरी येथील रहिवाशी असून त्यांचे माध्यमिक शालेय शिक्षण योगेश्वरी नुतन विद्यालय,अंबाजोगाई येथे झाले आहे.डॉ.ठोंबरे यांनी देशी गोवंशाच्या जातींचा अनुवंशिक अभ्यास,मराठवाड्यातील नामवंत देशी गोवंश देवणी व लाल कंधारी या जातीच्या प्रजोत्पादन क्षेत्रातील गोपालकांच्या गोवंशाचा सर्वेक्षणाद्वारे महत्वपूर्ण अभ्यास करून त्यातील गुण व अवगुणांबाबत संशोधन केले आहे.त्याच बरोबर होलदेव संकरित गोवंश,मराठवाडी म्हैस व उस्मानाबादी शेळी या पशुधनाच्या पैदास,आहार,व्यवस्थापन,संशोधन व विकासासाठी डॉ.ठोंबरे यांचे भरीव योगदान राहिले आहे.तसेच कृषि पदविका,पदवी,पशुवैद्यकीय पदवी,उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे येथील प्राणीशास्त्र व तंत्रज्ञान या विषयीचे क्रमिक व संदर्भीय १४ पुस्तकांचे लिखाण केले आहे.विविध विषयांवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये १०० हुन अधिक संशोधनाचे लेख प्रकाशित झाले आहेत.कृषि पदव्युत्तर व आचार्य पदवीच्या स्नातकांना मुख्य संशोधन मार्गदर्शक तसेच विविध शेतकरी पशुपालक मेळावे,कृषि प्रदर्शने, शेतकरी व गुराखी प्रशिक्षणे,आकाशवाणी व दूरदर्शन आदी माध्यमांतून शेतक-यांना कृषि,पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायाबाबत जनजागृती व मार्गदर्शनाचे कार्य केले आहे.यापूर्वी त्यांना भारतीय कृषि संशोधन परिषद,नवी दिल्लीचा विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार,महाराष्ट्र राज्याचा राष्ट्रीय सेवा योजनेचा उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी पुरस्कार,कर्नाल हरियाणा राज्यातील आंतरराष्ट्रीय नियतकालिकाचा उत्कृष्ट समिक्षक पुरस्कार,मलकलपट्टे स्मृती प्रतिष्ठानचा कृषि व सामाजिक पुरस्कार, संजीवनी कृषि पुरस्कार व परभणी नगरी गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.त्यांनी रक्तदान शिबीरांचे आयोजन करून रक्तदान कार्यक्रमात सामाजिक कार्य केले आहे.
मंगळवार,दिनांक 5 मे रोजी अंबाजोगाई कृषि महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाचा पदभार स्विकारल्याबद्दल डॉ.दिगंबरराव चव्हाण,डॉ.अरूण गुट्टे,रमेशराव आडसकर,नंदकिशोर मुंदडा,अमर हबीब,नानासाहेब गाठाळ,राजेसाहेब देशमुख, राहुलभैय्या सोनवणे,गोविंदराव देशमुख,कालिदास आपेट,भास्कर आगळे,प्रा.डॉ.मुकुंद राजपंखे,दगडू लोमटे,शामराव शिंदे,सुदाम पाटील,सतीश लोमटे,राजू मोरे,संजय मोरे यांनी अभिनंदन केले आहे.तर डॉ.ठोंबरे यांच्या सारखे संशोधक,अभ्यासू व कृषि क्षेत्राशी गेली अनेक वर्षे निगडीत असणारे व्यक्तीमत्व अंबाजोगाई कृषि महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्त झाल्याबद्दल समाजाच्या सर्वस्तरांतून त्यांचे स्वागत होत आहे.


Previous post बीड: बाहेरील जिल्ह्यात जाण्या-येण्यासाठीच्या परवानगीच्या संकेतस्थळात बदल
Next post पाटोदा नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावातील ऊसतोड मजुरांना मोफत किराणा किट वाटप कोण करणार ? नगराध्यक्ष म्हणतात निधी आलाच नाही– डॉ.गणेश ढवळे